‘तुम बिन’मधल्या अभिनेत्याचा 23 वर्षांत बदलला इतका लूक; ओळखूच येईना

अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'तुम बिन' हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात हिमांशु मलिकने अभिज्ञानची भूमिका साकारली होती. 23 वर्षांनंतर या अभिनेत्याचा बदललेला लूक पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. त्याला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम बिनमधल्या अभिनेत्याचा 23 वर्षांत बदलला इतका लूक; ओळखूच येईना
हिमांशु मलिक, संदली सिन्हा
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 04, 2024 | 3:50 PM

अभिनेत्री जान्हवी कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘उलझ’ हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये तिच्यासोबत गुलशन दैवय्या, रोशन मॅथ्यू, मियांग चँग, राजेश तेलंग यांच्याही भूमिका आहेत. सुंधाशू सरियाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नुकतंच या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, अर्जुन कपूर, खुशी कपूर, वेदांग रैना, बोनी कपूर हे सर्वजण तिथे हजर होते. अशातच एका अभिनेत्याला पाहून सर्वजण थक्क झाले. या अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. तब्बल 23 वर्षांनंतर नेटकऱ्यांनी या अभिनेत्याला पाहिलं आणि त्याला इतका बदललेला लूक पाहून सर्वचजण थक्क झाले आहेत.

2001 मध्ये अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘तुम बिन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये संदली सिन्हा, प्रियांशु चॅटर्जी, हिमांशू मलिक आणि राकेश बापट यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यापैकी संदली, प्रियांशु आणि राकेश यांना सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेकदा पाहिलंय. मात्र हिमांशु मलिक या चित्रपटानंतर फारसा कुठे दिसला नाही. आता जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये जेव्हा त्याला पाहिलं गेलं, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. हिमांशु आता 50 वर्षांचा झाला असून त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. या स्क्रिनिंगला त्याने प्रिंटेड शर्ट आणि ब्लू पँट परिधान केलं होतं. 23 वर्षांनंतर हिमांशूचा इतका बदललेला लूक पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘वयोमानानुसार दिसण्यात बदल होऊ शकतो’, असं एकाने लिहिलं. तर ‘डब्ल्यू डब्ल्यूईमधील द केनसारखा दिसतोय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. हिमांशुचा जन्म 31 ऑक्टोबर 1973 रोजी झाला असून त्याने ‘ख्वाहिश’, ‘तुम बिन’, ‘चित्रकुट’, ‘मल्लिका’, ‘रोग’ आणि ‘कोई आप सा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘तुम बिन’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या अभिज्ञानच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं होतं. या चित्रपटातील गाणीसुद्धा खूप गाजली होती.