तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी 50 दिवसांनंतर सहअभिनेत्याचा मोठा खुलासा; म्हणाला..

| Updated on: Feb 14, 2023 | 10:56 AM

24 डिसेंबर 2022 रोजी तुनिशा 'अली बाबा: दास्तान ए काबुल' या मालिकेच्या सेटवर मृतावस्थेत आढळली. तुनिशाने आत्महत्या केल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. मात्र तिच्या निधनानंतर तुनिशाचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानला पोलिसांनी अटक केली.

तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी 50 दिवसांनंतर सहअभिनेत्याचा मोठा खुलासा; म्हणाला..
तुनिषा शर्मा
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येनं सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता तिच्या निधनाच्या 50 दिवसांनंतर अभिनेता चंदन के आनंदने मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चंदनने सांगितलं की तुनिशाला आत्महत्येच्या काही दिवस आधी त्याच्याशी बोलायचं होतं. मात्र वेळ कमी असल्याने तो तिच्याशी बोलू शकला नव्हता. “तुनिशाला माझ्याशी बोलायचं होतं. मात्र मला वेळ नाही मिळाला. सेटवर सतत काही ना काही काम असतंच. नंतर अचानक तिने असं टोकाचं पाऊल उचललं”, असं तो म्हणाला. चंदनने ‘अली बाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत तुनिशाचे काका सद्दाम यांची भूमिका साकारली होती.

24 डिसेंबर 2022 रोजी तुनिशा ‘अली बाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेच्या सेटवर मृतावस्थेत आढळली. तुनिशाने आत्महत्या केल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. मात्र तिच्या निधनानंतर तुनिशाचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानला पोलिसांनी अटक केली. शिझान सध्या तुरुंगात आहे. त्याच्या जामिन अर्जावर येत्या 17 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

काय म्हणाला चंदन?

चंदनने तुनिशाबद्दल सांगितलं, “काही गोष्टी इतरांसोबत शेअर करणं खूप गरजेचं आहे. तुनिशाचा स्वभाव खूप हसता-खेळता होता. काही लोक सोशल मीडियावरील फॉलोअर्ससाठी वेडे आहेत तर काही लोक मुख्य भूमिकेसाठी. मात्र ही घटना सर्वांसाठी जणू एक शिकवण आहे.”

हे सुद्धा वाचा

“लोक म्हणतात की ती नैराश्यात होती. मात्र असं काही नाही. ती डिप्रेशनचा सामना करत होती असं लोक म्हणायचे तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. ती नैराश्यात नव्हती. मात्र मृत्यूपूर्वी काय घडलं हे तिलाच माहीत”, असं तो पुढे म्हणाला.

तुनिशाच्या आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन गोष्टी समोर आल्या आहेत. तुनिशाच्या कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी केली जातेय. पोलिसांनी तुनिशाच्या आत्महत्या प्रकरणात लव्ह-जिहादच्या अँगलने तपास करावा, अशी मागणी तिच्य्या काकांनी केली. हे 100 टक्के लव्ह-जिहादचं प्रकरण आहे, असा दावा त्यांनी केला.

24 डिसेंबर रोजी तुनिशाने ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. याच मालिकेत तुनिशा आणि शिझान एकत्र काम करत होते. तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 25 डिसेंबर रोजी शिझानला अटक झाली. तुनिशाच्या आत्महत्येच्या 15 दिवस आधीच या दोघांचं ब्रेकअप झालं होतं.

तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी शिझानचा काहीच दोष नाही असं त्याचे वकील शैलेंद्र मिश्रा आणि शरद राय कोर्टात म्हणाले. इतकंच नव्हे तर आत्महत्येच्या 15 मिनिटं आधी तुनिशा ही अली नावाच्या व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती, असाही दावा त्यांनी केला. या अँगलने तपास करण्याची मागणी त्यांनी न्यायाधीशांसमोर केली. त्याचप्रमाणे घटनास्थळी कोणतीच सुसाईड नोट सापडलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.