दोन महिन्यांपूर्वीच करोडपती व्यावसायिकासोबत लग्न, आरती सिंहची हैराण करणारी पोस्ट, घटस्फोट…

आरती सिंह ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आरती सिंहचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले. आरती सिंह सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना दिसते. नुकताच आरतीने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.

दोन महिन्यांपूर्वीच करोडपती व्यावसायिकासोबत लग्न, आरती सिंहची हैराण करणारी पोस्ट, घटस्फोट...
Aarti Singh
| Updated on: Jun 30, 2024 | 2:09 PM

अभिनेता गोविंदाची भाची आणि कृष्णा अभिषेक याची बहीण आरती सिंह हिचे लग्न दोन महिन्यांपूर्वीच झाले आहे. विशेष म्हणजे या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले. आरती सिंह हिने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. बिग बॉसमध्येही धमाका करताना आरती सिंह दिसली. आरती सिंह हिने व्यावसायिक दीपक चाैहान याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे दीपक हा करोडो संपत्तीचा मालक आहे. आरती सिंह ही सोशल मीडियावर सतत सक्रिय आहे. दीपकसोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना आरती दिसते.

आता नुकताच आरती सिंह हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. आरती सिंह हिची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. आरती सिंह हिची ही पोस्ट पाहून तिच्या खासगी आयुष्यात वादळ आल्याची चर्चा आहे. लग्नाला दोन महिने पूर्ण होताच तिने अशाप्रकारची पोस्ट का शेअर केली असावी, अशी चर्चा आहे.

आरती सिंह हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, माझा संयम माझा देव बघत आहे, माझा संयम त्याकडे आहे आणि तुझा हिशोब देखील त्याच्याकडेच आहे. आता आरती सिंहची ही पोस्ट व्हायरल होताना दिसतंय. आरती सिंह आणि तिच्या पतीमध्ये वाद सुरू असल्याची चर्चा आहे. आरती सिंहची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

काही दिवसांपूर्वीच आरती सिंह ही विदेशात पतीसोबत धमाल करताना दिसली. यावेळीचे अनेक फोटोही व्हायरल होताना दिसले. कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. मात्र, वाद विसरून गोविंदा हा आरती सिंह हिच्या लग्नाला पोहोचला होता. आरतीने मामाने लग्नाला यावे, असे अनेक मुलाखतीमध्ये म्हटले होते.

आरती सिंह आणि कृष्णा अभिषेक यांच्यावर गोविंदा आणि त्याचे कुटुंबिय नाराज होते. हेच नाहीतर मागील काही वर्षांपासून गोविंदा हा कृष्णा अभिषेकला बोलत देखील नव्हता, याची खंत अनेकदा कृष्णा अभिषेक याने बोलून दाखवली होती. अखेर कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यातील वाद मिटल्याचे आता सांगितले जातंय. त्याच आता आरतीने अशाप्रकारची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.