
Mahhi Vij: टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री माही विज हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक दावे केले आहे. अभिनेता जय भानुशाली आणि माही विज यांचं लग्न 2010 मध्ये झालं. लग्नाच्या 9 वर्षांनंतर अभिनेत्रीने लेक तारा हिला जन्म दिला. पण प्रेग्नेंसीचा काळ माहीसाठी अत्यंत कठीण होता. प्रेग्नेंसीमध्ये अभिनेत्रीला अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. सासरची मंडळी आणि मित्र परिवाराने देखील अभिनेत्रीची प्रेग्नेंसीच्या दिवसांत काळजी घेतली नाही.
माही विजने आई होण्याच्या तिच्या कठीण प्रवासाबद्दल उघडपणं सांगितलं आहे. माही हिने 2021 मध्ये आयव्हीएफद्वारे तिची मुलगी ताराला जन्म दिला, परंतु या प्रक्रियेत तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. लग्नानंतर गरोदर राहात नसल्यामुळे सासरच्या मंडळींनी आणि मित्रांनी माहीला वाईट वागणूक दिली. नजर लागू नये म्हणून अभिनेत्रीला डोहाळे जेवणाला देखील बोलवायचे नाहीत.
माहीने वयाच्या 32 व्या आयव्हीएफ उपचार सुरु केली. कारण अभिनेत्रीला मातृत्वाचा अनुभव घ्यायचा. पहिल्या दोन वेळा IVF उपचार फेल झाले. ज्यामुळे अभिनेत्रीला प्रचंड दुःख झालं. देबिना बोनर्जीच्या पॉडकास्टमध्ये माहीने मोठा खुलासा केला. जेव्हा ती गर्भवती राहू शकली नाही तेव्हा तिचे काही जवळचे नातेवाईक आणि मित्र तिची थट्टा करायचे आणि तिच्याशी वाईट वागणूक द्यायचे.
लोक माहीच्या वयाबद्दल आणि लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही ती आई होऊ शकली नाही याबद्दल तिची चेष्टा करायते. काहींनी तिच्या वाढत्या वजनावरही भाष्य केलं, जे आयव्हीएफमध्ये वापरल्या जाणाऱ्या हार्मोनल औषधांमुळे झाले. माही आणि जय सुरुवातीला मुलासाठी तयार नव्हते. माहीने ९ महिने गर्भधारणेचा अनुभव घ्यावा अशी जय याची इच्छा होती, म्हणून त्याने सरोगसीचा पर्याय निवडला नाही.
गेल्या काही दिवसांपासून माही आणि जय याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत… असं अभिनेत्री म्हणाली. ‘तथ्य नसलेल्या चर्चा सर्वत्र होत आहे. आमचा घटस्फोट होत असेल तरी मी का कोणाला सांगू? तुमचे काका आमच्या वकिलाची फी भरणार आहेत का?’ माही म्हणाली की आजही समाज घटस्फोटित महिलांकडे वेगळ्या नजरेने पाहतो. म्हणून स्वतः जगा आणि इतरांनाही जगू द्या.