रामायण फेम अभिनेत्रीची निर्घृण हत्या, दोरीने बांधून छळ, गळा कापला, त्यानंतर…
Actress Death Case: गुंड घरात घुसले, अभिनेत्रीला दोरीने बांधून केला छळ, गळा कापला, त्यानंतर... धक्कादायक आहे घटना, पण आजही मोकाट फिरत आहेत आरोपी..., जाणून तुम्हाला देखील बसेल मोठा धक्का

Actress Death Case: रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. 80 च्या दशकात घरा-घरात प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेल्या मालिकेतील कलाकार आजही चाहत्याच्या लक्षात आहे. मालिकेतील काही कलाकार आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. आज अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेवू जिची निर्घृण हत्या करण्यात आली आणि तिचे मारेकरी आजही मोकाट फिरत आहेक. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे, त्या अभिनेत्रीचं नाव उर्मिला भट्ट असं आहे. जिने हिंदी, गुजराती आणि राजस्थानी सिनेमांमध्ये काम केलं आहे. 22 फेब्रुवारी 1997 मध्ये उर्मिला यांनी त्यांच्या घरी हत्या करण्यात आली.
त्या दिवशी काय झालेलं?
22 फेब्रुवारी 1997 चा तो काळा दिवस जेव्हा उर्मिला भट्ट त्यांच्या गुजरात येथील घरात एकट्याच होत्या. तेव्हा काही अज्ञात व्यक्ती अभिनेत्रीच्या घरात घुसले. त्यांनी अभिनेत्रीला दोरीने बांधलं आणि धारदार हत्यारांनी अभिनेत्रीचा गळा कापला. त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तू चोरून ते फरार झाले. तेव्हा अभिनेत्रीचा मृतदेह रक्ताने माखलेला आढळला आणि घरातील सामान विखुरलेले होते.
मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत
पोलिसांनी घटनास्थळाची चौकशई केली आणि अनेकांना घटनेबद्दल विचारलं, पण पोलिसांना कोणतेच पुरावे आढळले नाहीत. एवढंच नाही तर, हे प्रकरण अद्याप उलगडलेलं नाही आणि मारेकऱ्यांची ओळख पटलेली नाही.

दरम्यान, अभिनेत्री तबस्सुम यांनी त्यांच्या तबस्सुम टॉकीज शोमध्ये सांगितलं की, उर्मिलाची हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आली होती. तिचा मृतदेह दोरीने बांधलेला होता आणि गळ्यावर खोल जखमा होत्या.
उर्मिला यांचं करीयर
उर्मिला यांचा जन्म 1934 मध्ये देहरादून येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना नाट्य आणि संगीताची आवड होती. त्यांनी लोक गायिका आणि नर्तक म्हणून स्वतःच्या कारकिर्दीची सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी हिंदी, गुजराती आणि राजस्थानी चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या शेवटच्या सिनेमाचं नाव ‘पापी देवता’ असं होतं. ज्यामध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्या आईची भूमिका बजावली होती.
खासगी आयुष्य…
उर्मिला यांचं लग्न प्रसिद्ध गुजराती रंगभूमी कलाकार मकरंद भट्ट यांच्याशी झालं होतं. त्यांना एक मुलगी आणि दोन मुले होती. त्यांचं जीवन सामान्य आणि आनंदी होते, परंतु या हत्येने सर्व काही बदलून गेलं.
