AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पण खरंय… इथे भाडयाने मिळतात गर्लफ्रेंड, फिरण्याचा- खाण्यापिण्याचा रेट इतका, धक्काच बसेल

Relationship Trend: 'या' ठिकाणी भाड्याने मिळतात ग्लॅमरस गर्लफ्रेंड, ग्राहकाच्या गरजेनुसार ठरवण्यात येतं भाडं, दबावामुळे पुरुषांना एका तासासाठी मोजावी लागते मोठी रक्कम

पण खरंय… इथे भाडयाने मिळतात गर्लफ्रेंड, फिरण्याचा- खाण्यापिण्याचा रेट इतका, धक्काच बसेल
फाईल फोटो
| Updated on: Jul 07, 2025 | 12:20 PM
Share

Relationship Trend: आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात जग देखील झपाट्याने बदलत आहे. आजच्या डिजिटल युगात नात्यांची व्याख्या देखील बदलू लागली आहे. . जनरेशन झेडच्या (Gen Z) युगात, आपल्याला प्रेम संबंधांबद्दल दररोज नवीन ट्रेंड पाहायला आणि ऐकायला मिळतात. पण आता अशा एका ट्रेंडबद्दल जाणून घेवू, ज्यामुळे तुम्ही हैराण व्हाल … काही देशांमध्ये गर्लफ्रेंड भाड्याने मिळते. एवढंच नाही तर , यासाठी अनेक देशांमध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स देखील आहे, ज्यावर काही प्रक्रिया पूर्ण करून भाड्याने गर्लफ्रेंड मिळवू शकता. यामागचं कारण देखील हैराण करणारे आहे.

या देशात मिळतात भाड्याने गर्लफ्रेंड

भाड्याने गर्लफ्रेंड ही संकल्पना जपान येथून सुरु झाली. पण आज चीन, दक्षिण कोरिया आणि थायलंड सारख्या आशियाई देशांमध्ये भाड्याने गर्लफ्रेंड ही संकल्पना खूप प्रसिद्ध आणि सामान्य झाली आहे. या देशांमध्ये, तुम्ही वेगवेगळ्या अॅप्सद्वारे तुमच्या आवडीनुसार काही काळासाठी भाड्याने गर्लफ्रेंड बुक करू शकता. या गर्लफ्रेंड पूर्णपणे प्रोफेशनल असतात.

कशी काम करते ‘Rent-a-Girlfriend’ संकल्पना?

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही सेवा जपानमधील काही कंपन्यांनी सुरू केली होती. या कंपन्या ग्राहकांसोबत वेळ घालवणाऱ्या प्रोफेशनल मुलींना प्रशिक्षण देतात. यामध्ये फक्त सामाजिक संवादाची सुविधा दिली जाते. म्हणजे गर्लफ्रेंड ग्राहकासोबत डिनर डेट, कौटुंबिक कार्यक्रम, सिनेमा पाहणं, शॉपिंग करणं, फिरायला जाणं… किंवा फक्त गप्पांपर्यंत मर्यादीत होत्या.

ग्राहक थेट अ‍ॅपवर जाऊन या मुलींचे फोटो, आवडी-निवडी, सवयी आणि भाषेच्या आधारे स्वतःसाठी टेंपरेरी गर्लफ्रेंड निवडू शकतात. यानंतर, एक वेळ बुक केली जाते आणि मुलगी त्या निश्चित वेळी क्लायंटला भेटते.

किती असतं भाडं?

मुलीचा अनुभव आणि तुम्ही कोणत्या उद्देशाने गर्लफ्रेंड बुक करत आहात (जसे की डेटवर जाणे, कुटुंबाला भेटणे किंवा फक्त गप्पा मारणे) हे लक्षात घेऊन भाडं ठरवलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, भाड्याच्या गर्लफ्रेंडसाठी एका तासासाठी ग्राहकाला 4 हजार येन म्हणजे 2 हजार 509 रुपये मोजावे लागतात. तर क्लायंटला प्रवास, चित्रपट तिकिटे, जेवण आणि पेये यासारख्या सुविधांच्या खर्चासाठी वेगळे पैसे द्यावे लागतात.

भाड्याच्या गर्लफ्रेंड का घेतली जाते?

जपान आणि चीनसारख्या देशांमध्ये, गर्लफ्रेंड भाड्याने घेण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे, येथील लोक एकाकीपणा, ब्रेकअप किंवा तणावाच्या वेळी स्वतःला बरं करण्यासाठी या सेवेचा वापर करतात. तर काही व्यक्ती कुटुंब आणि नातेवाईकांच्या दबावामुळे असं करतात. लग्नापासून दूर पळण्यासाठी देखील भाड्याच्या गर्लफ्रेंडचा पर्याय स्वीकारला जातो. गर्लफ्रेंला भाड्याने घेण्याची ही पद्धत योग्य आहे की नाही यावर लोकांची वेगवेगळी मते असू शकतात.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.