AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी दक्षिण अफ्रिकेचा मालिका विजय, पण वेस्ट इंडिजचं कमबॅक

दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. ही मालिका दक्षिण अफ्रिकेने 2-1 ने जिंकली. पहिला दोन सामने गमावल्यानंतर वेस्ट इंडिजने ही मालिका गमावली होती. पण त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं आणि तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी दक्षिण अफ्रिकेचा मालिका विजय, पण वेस्ट इंडिजचं कमबॅक
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी दक्षिण अफ्रिकेचा मालिका विजय, पण वेस्ट इंडिजचं कमबॅकImage Credit source: Proteas Men Twitter
| Updated on: Feb 01, 2026 | 9:31 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका झाली. या चाचणी परीक्षेत दक्षिण अफ्रिकेने बाजी मारली. दक्षिण अफ्रिकेने ही मालिका 2-1 ने खिशात घातली. खरं तर या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात वेस्ट इंडिजला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे मालिका हातून गेली होती. पण शेवटच्या सामन्यात विजय मिळवून वेस्ट इंडिजने टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी विजयी ट्रॅक पकडला आहे.. पहिला सामना वेस्ट इंडिजला 9 विकेट पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने त्यांना 7 विकेटने पराभूत केलं. पण मालिका गमावली असली तरी वेस्ट इंडिजने तिसऱ्या सामन्यात कमबॅक केलं. हा सामना पावसामुळे फक्त 10 षटकांचा झाला. वेस्ट इंडिजने 10 षटकात 3 गडी गमवून 114 धावा केल्या. पण डकवर्थ लुईस नियमानुसार 125 धावांचं टार्गेट दिलं गेलं. हे आव्हान काही दक्षिण अफ्रिकेला गाठता आलं नाही. दक्षिण अफ्रिकेने 10 षटकात 6 गडी गमवून 118 धावा केल्या. हा सामना वेस्ट इंडिजने 6 धावांनी जिंकला.

तिसऱ्या सामन्यात पराभव झाला असला तरी दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी समाधानी आहे. ‘मला वाटलं की ही एक चांगली मालिका होती. आमच्याकडून बरेच चांगले संकेत आहेत. बरेच चांगले खेळाडू जे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, जे नेहमीच एक मोठी सकारात्मक आणि विश्वचषकात जाणे ही एक चांगली गोष्ट असते. आणि आता फक्त तिथे पोहोचणे, त्यांचे मूल्यांकन करणे, त्या परिस्थितीची पुन्हा सवय होणे याबद्दल आहे. सुदैवाने, आम्ही तिथे बरेच क्रिकेट खेळलो आहोत आणि मैदानावर धावण्याचा प्रयत्न करतो. आम्ही तिथे पोहोचताच आणि नंतर, हो, थेट स्पर्धेत उतरताच आमचा तो सराव सामना आहे. पुढे खूप रोमांचक काळ आहे आणि हो, संघ कुठे आहे याबद्दल आम्ही समाधानी आहोत.’, असं एडेन मार्करम म्हणाला.

वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप म्हणाला की, ‘मला वाटते की विजय आवश्यक आहे, विशेषतः गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून. आपण खरोखर सत्यापासून लपू शकत नाही. गेल्या काही वर्षांत आपण जितके चांगले खेळू इच्छितो तितके चांगले खेळत नाही आहोत. अशा प्रकारच्या दबावाच्या परिस्थितीत आपण स्वतःला शोधू शकलो आणि अंमलात आणू शकलो हे पाहून आनंद झाला. पहिल्या गेमसाठी शमार येत आहे आणि तो काय करू शकतो हे दाखवत आहे. त्या गोष्टी पाहून खूप आनंद झाला. आणि मी म्हटल्याप्रमाणे, आपल्याला येथून पुढे जायचे आहे.’

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...