AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात नरसंहार! सैन्य आणि बंडखोरांमधील चकमकीत 200 जणांचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Balochistan : बलुच बंडखोर आणि सैन्यात तुफान चकमक सुरु आहे. या संघर्षात आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 145 बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) सैनिक, 17 सुरक्षा कर्मचारी आणि 31 नागरिकांचा समावेश आहे.

पाकिस्तानात नरसंहार! सैन्य आणि बंडखोरांमधील चकमकीत 200 जणांचा मृत्यू, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
BalochistanImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 01, 2026 | 9:35 PM
Share

गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानातील बलुचीस्तान प्रांतात खळबळ उडाली आहे. बलुच बंडखोर आणि सैन्यात तुफान चकमक सुरु आहे. शनिवारी बलुच बंडखोरांनी सैन्यावर हल्ला केला होता, त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली. या कारवाईत आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 145 बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) सैनिक, 17 सुरक्षा कर्मचारी आणि 31 नागरिकांचा समावेश आहे. गेल्या 40 तासांपासून ही चकमक सुरू आहे. या कारवाईतील मृतांचा आकडा हा पाकच्या लष्करी कारवाईच्या इतिहासातील सर्वाधिक आकडा आहे अशा माहिती मुख्यमंत्री सरफराज बुगटी यांनी केली आहे.

तुरुंग फोडून कैद्यांना मुक्त केले

बलुच लिबरेशन आर्मी या बंडखोर गटाने ऑपरेशन हारोफ चा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यामुळे बलुचिस्तान प्रांतात परिस्थिती बिकट झाली आहे. बीएलएचे प्रवक्ते जियांद बलोच यांनी म्हटले की, आमच्या सैनिकांनी नोश्की येथील दहशतवाद विरोधी विभागाचे मुख्यालय ताब्यात घेतले असून जिल्हा तुरुंगातून 30 कैद्यांना मुक्त केले आहे. तसेच बंडखोरांनी अनेक पाकिस्तानी सैन्य तुकड्या नष्ट केल्या आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा लुटला. क्वेटा, ग्वादर आणि मुस्तुंग सारख्या भागात या कारवाया झाल्याने पाकिस्तान सरकारची झोप उडाली आहे.

पाकिस्तानची भारतावर टीका

पाकिस्तानात घडणाऱ्या या घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला अपयश आले आहे. मात्र आता पाकिस्तानी लष्कर आणि संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या हल्ल्यांसाठी भारताला जबाबदार धरले आहे. या आरोपांनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पाकिस्तान स्वतःच्या चुकांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भारतावर आरोप करत आहे. आमच्यावर आरोप करण्याऐवजी पाकिस्तानने आपल्या लोकांच्या मागण्या ऐकणे गरजेचे आहे.

बलुचिस्तानला छावणीचे रूप

दहशतवाद आणि हिंसाचारामुळे संपूर्ण बलुचिस्तान प्रांताचे छावणीत रूपांतर झाले आहे. सुरक्षा दलांनी अनेक भाग सील केले आहेत. या भागातील इंटरनेट सेवा 24 तासांपासून बंद आहे. या स्फोटांनंतर क्वेटासारख्या प्रमुख शहरांमधील बाजारपेठा ओसाड पडल्या आहेत. ट्रेनपासून आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगामी काळात या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!