प्रसाद लाड कुठेही दिसो कानशिलात लगावणार… राज्यातील बडा ओबीसी नेता आक्रमक, थेट..
लक्ष्मण हाके यांनी नुकताच प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली. प्रसाद लाड यांना समज द्यावी, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले. कुठेही दिसले तरीही प्रसाद लाड यांच्या कानशिलात लगावणार असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली म्हणून त्यांच्यावर टीका करणाऱ्या प्रसाद लाड यांची मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलही बोलण्याची भाषा बदलली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर जरांगे यांनी चर्चेसाठी बोलावल्यावर तिथे प्रसाद लाड गेले. यादरम्यान त्यांना मराठा आंदोलकांकडून धमक्या दिल्या जात होत्या. जरांगे यांच्यासोबत प्रसाद लाड यांनी चर्चा केली. त्यानंतर सातत्याने मराठा आरक्षणाबद्दल बोलताना प्रसाद लाड दिसत आहेत. आता ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका प्रसाद लाड यांच्यावर केली. फक्त टीकाच नाही तर TV9 ला बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, प्रसाद लाड मला कुठेही दिसो… त्याच्या कानाखाली मारल्याशिवाय राहणार नाही.
लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, प्रसाद लाड जिथे कुठे दिसले, त्याच्या कानशिलात लगावणार आहे. यादरम्यान ते वारंवार प्रसाद लाड यांच्या कानशिलात लगावणार असल्याचा इशारा देताना दिसले. लक्ष्मण हाके म्हणाले, प्रसाद लाड ज्या ज्या ठिकाणी दिसतील पहिल्यांदा मी त्यांच्या कानशिलात लगावणार. मला गोळ्या घाला जेलमध्ये टाका… मी त्याला कानशीलात लगावणार.
प्रसाद लाड म्हणतात यांच्या मागे माणसे आहेत, तुला माझ्या मागची माणसे बघायची आहेत? असाही सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. विखे सारख्या माणसाला ही भाषा शोभते का? ओबीसी जागा झाला तर तुम्ही वाहून जाल, असाही मोठा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. विखेंना आरक्षणाच काय कळत, असेही म्हणण्यात आले. देवेंद्र फडणवीस तुम्ही प्रसाद लाड यांना आवरा.
आता चॉपर घेतल आहे, कुठे राबायला गेले होते का? मंडल आयोगाला चॅलेंज केल तर पंतप्रधान पण राहणार नाही, मी म्हणतो की, चॅलेंज करून तरी बघा मग तुम्हाला कळेल, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले. लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यासोबत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली.
