AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरा चाटल्यामुळे खरंच मृत्यू होतो का? काय आहे नेमकं सत्य? तुम्हालाही ऐकून बसेल धक्का

अनेक ठिकाणी आपण असं ऐकतो, की हिरा चाटल्यामुळे माणसाचा ताबडतोब मृत्यू होतो? परंतु हे खरं आहे का? खरच असं होतं का? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

हिरा चाटल्यामुळे खरंच मृत्यू होतो का? काय आहे नेमकं सत्य? तुम्हालाही ऐकून बसेल धक्का
diamondImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 01, 2026 | 9:35 PM
Share

असं म्हटलं जातं की तुम्ही जर हिऱ्याला चाटलं तर लगेच तुमचा मृत्यू होतो. पूर्वीपासून हे सातत्यानं आपल्या मनावर बिंबवलं जात आहे, अनेकदा अशा पद्धतीचा इशारा देखील दिला जातो. मात्र खरच असं होतं का? हिऱ्याला चाटल्यामुळे खरच मृत्यू होतो का? आतापर्यंत अशा किती घटना घडल्या आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. हिऱ्याला चाटल्यामुळे मृत्यू होतो असा दावा जरी करण्यात येत असला तरी देखील जेव्हा तुम्ही या घटनेकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पहाता तेव्हा तुम्हाला कळतं की हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, हिऱ्याला चाटल्यामुळे कधीही कोणाचा मृत्यू होत नाही. ही एक दंत कथा आहे, ज्याचं खूपच नाटकीय पद्धतीने वर्णन करण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात या मागचं नेमकं सत्य काय आहे?

वैज्ञानिक दृष्टीकोनातून सांगायचं झाल्यास हिरा हा 99.95 टक्के कार्बन पासून बनलेला असतो. कार्बन हा पृथ्वीवरील एक घटक आहे, जो विविध माध्यमांमध्ये हवा, पाणी एवढंच नाही तर मानवी शरीरामध्ये देखील आढळून येतो. तसेच हिरे हे रासायनिक स्वरुपात देखील निष्क्रिय असतात, याचाच अर्थ असा की कोणत्याही रासायनिक पदार्थांसोबत त्याची प्रक्रिया होत नाही, हे कारण आहे, ज्यामुळे तुम्ही जर हिऱ्याला स्पर्श केला किंवा त्याला जर जिभेनं चाटलं तर तुमचा मृत्यू होत नाही. हिऱ्यामधून कोणतेही विषारी पदार्थ उत्सर्जित होत नाहीत.

जगातील सर्वात कठीण पदार्थ

हिरा हा जगातील सर्वात कठीण पदार्थ आहे. मात्र तुम्ही जर हिऱ्याला चाटलं तर तुमचा मृत्यू होत नाही, मात्र तुम्ही जर हिऱ्याला गिळलं तर मात्र तुमचा मृत्यू होण्याची शक्यता असते, कारण हिऱ्याला टोक असतात, या टोकांमुळे तुमच्या पोटातील पेशींना इजा पोहचून अंतर्गत रक्तस्त्रावाचा धोका वाढतो, अशा परिस्थितीमध्ये तुमचा मृत्यू होऊ शकतो. मात्र प्राचीन काळात अनेक ठिकाणी हिरा चाटल्यामुळे मृत्यू होतो, असा उल्लेख आढळून येतो, मात्र या सर्व कथा आहेत.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं