तो स्मशानभूमीतील मृत शरीरांचे मांस खायचा आणि…, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Bollywood Actress: स्मशानभूमीत तो माला त्याच्या मागे न्यायता, मृत शरीरांचे मांस खायचा आणि..., अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, तुम्हालाही बसणार नाही विश्वास, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

अभिनेत्री नरगिस फाखरी आता बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. नरगिस हिने बॉयफ्रेंड टोनी बेग याच्यासोबत लग्न केलं आहे. नरगिस कायम तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना चाहत्यांसोबत शेअर करत असते. ‘फिल्मफेयर’ मध्ये अभिनेत्रीने मोठा खुलासा केला. 2013 मध्ये झालेल्या मुलाखतीत नरगिस हिने स्वतःला पडणाऱ्या विचित्र स्वप्नांबद्दल सांगितलं होतं.
नरगिस म्हणाली, ‘जेव्हा मी मुंबई मधील वांद्रे येथील हिल रोड परिसरात राहायची तेव्हा एक विचित्र आणि भयानक माणूस माझ्या सतत स्वप्नात यायचा… जोपर्यंत मी त्या घरात राहिली तोपर्यंत तो विचित्र माणूस माझ्या स्वप्नात यायचा. मला रोज रात्री 3.30 मिनिटांनी स्वप्न पडायचे.’
View this post on Instagram
अभिनेत्री म्हणाली, ‘तो मला स्मशानभूमीती त्याच्या मागे चालायला सांगायचा आणि स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर तो मृत व्यक्तींचा मांस खायचा आणि मसा देखील खायला सांगायचा. मला तो मांस खायला द्यायचा.. तेवढ्यात मला जाग यायची… मोठ्या कठीण परिस्थितीत मी त्या अपार्टमेंटमध्ये एक आठवडा राहिली. मी प्रचंड घाबरलेली होती. रॉकस्टार सिनेमाची शुटिंग करत असताना माझ्यासोबत ही घटना घडली..’ अशी धक्कादायक घटना अभिनेत्रीसोबत घडली होती.
नाईट क्लबमध्ये मिळालेला मुलाचा नंबर…
नाईट क्लबमध्ये गेली असताना नरगिस हिला एका मुलाने मोबाईल नंबर दिला होता. अभिनेत्री म्हणाली, ‘एका व्यक्तीने मला नाईट क्लबमध्ये स्वतःचा मोबाईल नंबर दिला आणि माझ्या कानात हळूच म्हणाला मला नक्की कॉल कर, तुला निराश करणार नाही… असं वचन देतो…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
View this post on Instagram
नरगिस हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, आज अभिनेत्रीला कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉकस्टार’ या सिनेमातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात अभिनेता रणबीर कपूर याने मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील दमदार कामगिरी केली.
