श्वेता तिवारी म्हणजे संसार मोडणारी बाई…, भाजप खासदाराच्या पहिल्या पत्नीचा संशय, अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपच्या चर्चा अन्…
अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या कामामुळे तर चर्चेत राहिलीच, पण तिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा आजही रंगत आहेत. भाजप खासदाराच्या पहिल्या बायकोने तर, श्वेता हिच्या संसार मोडण्याचे देखील आरोप केलेले. यावर खुद्द खासदाराने मोठं वक्तव्य केलं होतं...

अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिची तुलना टीव्ही विश्वातील सर्वांत लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत केली जाते. ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या श्वेता हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण श्वेता हिने फक्त टीव्हीच नाही तर, हिंदी, मराठी, नेपाळी आणि भोजपुरी सिनेमांमध्ये देखील काम केली. अभिनेत्रीचा पहिला भोजपुरी सिनेमा ‘कब अइबू अंगनवा हमार’ प्रचंड हिट झाला. सिनेमात श्वेता हिने अभिनेते मनोज तिवारी यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली. मनोज तिवारी हे भाजपचे खासदार देखील आहेत. श्वेता आणि मनोज तिवारी यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. पण यामुळे मनोज यांच्या खासगी आयुष्यात मोठं वादळ आलेलं. मनोज यांच्या पहिल्या पत्नीने श्वेता हिच्यावर घर मोडणारी बाई… म्हणत गंभीर आरोप केले.
एककाळ असा होता जेव्हा भोजपुरी सिनेविश्वात श्वेता आणि मनोज तिवारी यांची जोडी लोकप्रिय ठरली होती. श्वेता हिने पहिल्याच भोजपुरी सिनेमात नयना ही भूमिका साकारलेली. त्यानंतर श्वेता आणि मनोज तिवारी अनेक सिनेमांमध्ये एकत्र देखील झळकले. एवढंच नाही तर, अनेक म्यूझिक व्हिडीओमध्ये देखील दोघे दिसले. ‘बिग बॉस’ मध्ये देखील दोघांची चांगली मैत्री दिसून आली.
श्वेता तिवारी आणि मनोज तिवारी यांच्या मैत्रीच्या सर्वत्र चर्चा रंगलेल्या होत्या. पण दोघांची मैत्री मनोज तिवारी यांच्या पहिल्या पत्नीला खटकत होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव राणी तिवारी असं आहे. राणी यांनी मनोज आणि श्वेता यांच्या मैत्रीवर संशय देखील घेतला. एवढंच नाही तर, ‘श्वेता तिवारी म्हणजे संसार मोडणारी बाई…’ असं देखील राणी म्हणालेल्या. पण मनोज तिवारी कायम एकच म्हणायचे की, श्वेता माझी चांगली मैत्रीण आहे…
मनोज तिवारी यांच्या पहिल्या पत्नीने श्वेतावर गंभीर आरोप केले. पण मनोज यांच्यासोबत त्यांचं लग्न फार काळ काही टिकलं नाही. 2012 मध्ये मनोज तिवारी आणि राणी तिवारी यांचा घटस्फोट झाला. पण श्वेता हिच्यासोबत असलेली मनोज यांची मैत्री संपली नाही.
‘बिग बॉस’ दरम्यान मनोज तिवारी यांनी आपल्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांबद्दलही भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या आणि श्वेता यांच्यातील संबंधांबाबत त्यांची पत्नी संशय घ्यायची आणि त्यांचं अफेअर सुरू असल्याचा तिचा समज होता. मात्र, मनोज यांनी स्पष्ट केलं की, त्या फक्त अफवा होत्या आणि श्वेता ही त्यांची चांगली मैत्रीण होती.
श्वेता हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, श्वेता हिने दोन लग्न केली. पण दोन्ही लग्नात अभिनेत्रीला वैवाहिक आयुष्याचं सुख फार काळ अनुभवता आलं नाही. दोन्ही पतींवर गंभीर आरोप करत अभिनेत्रीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. आज श्वेता तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.