मुंबई : उर्फी जावेद हिने अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख नक्कीच निर्माण केलीये. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही फॅन फाॅलोइंगमध्ये एखाद्या बाॅलिवूड अभिनेत्रीला आरामात मागे टाकते. उर्फी जावेद हिच्यावर लोक तिच्या कपड्यांमुळे टिका जरी करत असतील तरीही लोक तिला मोठ्या प्रमाणात फाॅलो करतात ही वस्तूस्थिती आहे. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी उर्फी जावेद खास फोटो (Photo) आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते.
उर्फी जावेद ही महिन्याला कोट्यवधीची कमाई करते. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. तिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अंदाजा लावणे फार जास्त कठीण आहे. नेहमीच तिच्या कपड्यांमुळे तिच्यावर टिका केली जाते.
नुकताच उर्फी जावेद हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये उर्फी जावेद ही काही धक्कादायक खुलासे करताना दिसली. इतकेच नाही तर उर्फी जावेद हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाले. उर्फी जावेद हिला विचारण्यात आले की, तू घरी कशी राहते? यावर उर्फी जावेद थेट म्हणाली की, मी घरात कपडेच घालत नाही. मी घरात असताना काहीच घालत नाही.
पुढे उर्फी म्हणाली, मी यामुळेच मोठे आलिशान घर खरेदी केले. मी अगोदर किरायाच्या घरात राहत होते, त्यावेळी एका रूममध्ये 8 ते 10 मुली असायच्या, म्हणून मी आता मोठे घर घेतले आहे. ज्यामध्ये मी कपडे न घालता देखील फिरू शकते. घरीच काय मी तर बाहेरही तशीच फिरते. टी-शर्ट पायात घालते आणि पॅन्टवरती घालते.
आता उर्फी जावेद हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. आता या विधानांमुळे उर्फी जावेद ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्याचे बघायला मिळत आहे. लोक उर्फी जावेद हिला खडेबोल सुनावताना दिसतायंत. उर्फी जावेद ही नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे एक व्यक्तीने खडेबोल सुनावले होते. याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला.