AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पडद्यावर आदर्श बहु, वास्तवात संसाराचे तीन तेरा, एकदा मोडलं दुसऱ्यांदा बोहल्यावर, टीव्ही हिरोईन्सची कहाणी

जेव्हा दोन लोक विवाहित जीवनात प्रवेश करतात तेंव्हा दोघांमधील प्रेम, बॉन्डिंग आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणीलासोबत मिळून सामोरे जावे लागते.

पडद्यावर आदर्श बहु, वास्तवात संसाराचे तीन तेरा, एकदा मोडलं दुसऱ्यांदा बोहल्यावर, टीव्ही हिरोईन्सची कहाणी
| Updated on: Feb 02, 2021 | 2:00 PM
Share

मुंबई : जेव्हा दोन लोक विवाहित जीवनात प्रवेश करतात तेंव्हा दोघांमधील प्रेम, बॉन्डिंग आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणीलासोबत मिळून सामोरे जावे लागते. जीवनात कितीही अडचणी आल्यातरी एकमेकांना साथ देणार अशी वचने देण्यात येतात मात्र, प्रत्यक्षात तसे काही घडताना दिसत नाही. टीव्ही पडद्यावर आदर्श बहु म्हणून घेणाऱ्या अनेक अभिनेत्रींची खऱ्या आयुष्यात लग्न टिकत नाहीत. रोजचे भांडणे, किटकिट यापेक्षा हे घटस्फोट घेऊन वेगळे होण्यावर टीव्ही हिरोईन्स जास्त भर देताना दिसत आहेत. यामध्ये अशा किती अभिनेत्री आहे की, त्यांचे पहिले लग्न टिकले नाहीत हे आपण बघणार आहोत. (TV serial famous bahu who get a divorce in real life)

news photo

यामध्ये टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कडचे लग्न 2013 मध्ये रौनक सॅमसनशी झाले होते, जो पेशाने पायलट होता. मात्र, यांचे लग्न काही जास्त काळ टिकू शकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला त्यानंतर दीपिकाने शोएब इब्राहिमसोबत लग्न करून आपला संसार परत एकदा थाटला आहे.’राहुल दुल्हनिया ले जाएंगे’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये राहुल महाजनने कलकत्ताच्या डिंपी गांगुलीसोबत लग्न केले होते. त्यानंतर डिंपीने राहुलवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. राहुल आणि डिंपीचे लग्न 2010 मध्ये झाले होते तर 2015 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर डिंपीने तिचा शाळेतील मित्र रोहित रॉयशी लग्न केले.

dimpi gagauli

काम्या पंजाबीने 2020 साली 10 फेब्रुवारीला दिल्लीतील व्यावसायिका शलभ दांगशी लग्न केले. काम्या आणि शलभ दांग हे त्यांच्या विवाहित जीवनात बरेच आनंदी आहेत, परंतू ज्यावेळी काम्या पंजाबी शलभ दांगशी लग्न करत होती त्यावेळी सोशल मीडियावर काम्यावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात येत होती. लोकांचे म्हणणे होते की, एक मुलगी असताना हिला लग्न करण्याची काय गरज आहे. मात्र, अशाप्रकारची टिका करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करत काम्याने शलभ दांगशी लग्न केले.

Gautami Kapoor

राम कपूर आणि त्यांची पत्नी गौतमी गाडगीळ ही चाहत्यांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. राम कपूर आणि गौतमी यांनी टीव्ही सीरियल ‘घर एक मंदिर’ मध्ये एकत्र काम केले होते आणि या शोमध्ये काम करत असताना दोघांनाही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, या दोघांचे लग्न होण्याच्या अगोदर गौतमी गाडगीचे एका व्यावसायिकासोबत लग्न झाले होते. परंतू ते जास्त काळ टिकू शकले नाही.

संबंधित बातम्या : 

आलियासोबत 200 बॅकग्राऊंड डान्सर्स, भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’त भव्यदिव्य गाणं

Shocking | ‘द कपिल शर्मा शो’ अचानक बंद झाल्यामुळे चर्चांना उधाण!

(TV serial famous bahu who get a divorce in real life)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.