
बॉलिवूड आणि टीव्ही विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये नाव मोठं केलं आहे. अनेक कलाकार स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मायानगरीत येतात. पण मायानरीत प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थाने संघर्ष सुरु होतो. असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. एक टीव्ही स्टार जी आता कोट्यवधींची मालकीण झाली आहे. पण एक वेळ अशी आली होती अभिनेत्री भंगार विकून उदरनिर्वाह करत होती आणि तिची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आहे… दिव्यांका हिने प्रचंड संघर्ष केला आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने याबद्दल मोठं वक्तव्य देखील केलं होतं. आर्थिक अडचणींबद्दल बोलताना दिव्यांका त्रिपाठी म्हणाली की ती, भंगार गोळा करायची जेणेकरून ती विकून पैसे कमवू शकेल.
दिव्यांका म्हणालेली, ‘एक शो संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा नव्या कामासाठी संघर्ष करावा लागतो… अनेकदा असं देखील होतं की, तुमच्याकडे पैसे नसतात… अशात तुम्हाला बील भरायचं असतं. ईएमआय भरायचं असतं अनेक मोठ्या जबाबदाऱ्या असतात… अशा वेळेस उदरनिर्वाह करण्यासाठी कोणतंही काम करण्यासाठी आपण तयार होतो… तुम्हाला फक्त स्वतःला आठवण करून द्यावी लागेल की गोष्टी नेहमीच अशा नसतील. तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील..
पुढे दिव्यांका म्हणाली, ‘मी भंगार एकत्र करायची… मी टूथपेस्टचे डब्बे गोळा करायची. त्याचा एक – एक रुपया यायचा… मी ते पैसे देखील बचत करायची… जमा झालेला भंगार देखील मी विकायची आणि पैसे कमवायची. कठीण काळात पैसे कमावण्याचे मार्ग शोधावे लागतात.’
आज दिव्यांकाकडे पैशांची कमतरता नाही. रिपोर्ट्सनुसार, ती एका शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी जवळपास 2 लाख रुपये घेते. तिची सध्याची एकूण संपत्ती 40 – 50 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. दिव्यांका तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. दिव्यांका हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.