TVK Vijay : ‘मी मुख्यमंत्री झालो तर…’, थलपती विजय यांनी राजकारणात येण्यापूर्वी दिलेलं वचन केलं पूर्ण

TVK Vijay : मुख्यमंत्री होण्याआधीच थलपती विजय यांनी दिलेलं मोठं वचन केलं पूर्ण... म्हणालेले, 'मुख्यमंत्री झालो तर मी...', तामिळनाडूच्या राजकारणात मोठे बदल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त थलपती विजय यांचीच चर्चा...

TVK Vijay : मी मुख्यमंत्री झालो तर..., थलपती विजय यांनी राजकारणात येण्यापूर्वी दिलेलं वचन केलं पूर्ण
TVK Thalapathy Vijay
| Updated on: May 05, 2026 | 9:21 AM

TVK Vijay : झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे थलपती विजय… साऊथ सिनेमाचे सुपरस्टार विजय थलपती यांनी ज्याप्रमाणे बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री केली, त्याच प्रकारे त्यांनी राजकारणात प्रवेश करताना मोठा इतिहास रचला आहे… सांगायचं झालं तर, विजय यांनी 2024 मध्ये स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. त्यांनी तमिलगा वेत्री कझगम (TVK) या नावाने पक्षाची स्थापना केली आणि 2026 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पहिल्यांदाच निवडणूक लढवून विजय यांनी इतिहास रचला आहे… 4 मे रोजी निवडणुकीचे निकाल समोर आले आणि विजय यांचा पक्ष मोठा पक्ष ठरला… आता तामिळनाडू येथील विजय थलपती यांची सत्ता येणार आहे.

विजय यांच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, 33 वर्ष त्यांनी अभिनेता म्हणून स्वतःची ओळख भक्कम केला. त्याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांना कधीच कोणत्याच सिनेमात मुख्यमंत्री साकारण्याची संधी मिळाली नाही. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सरकार’ सिनेमात विजय मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. पण तसं काहीही ढालं नाही.. अशात तेव्हा ‘सरकार’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वेळी विजय यांनी दिलेलं वचन अखेर पूर्ण केलं आहे.

दिग्दर्शक एआर मुरुगादॉस दिग्दर्शित ‘सरकार’ सिनेमाच्या वेळी अशी चर्चा होती की, विजय मुख्यमंत्र्याच्या भूमिकेत दिसतील. पण एका मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका नसल्याचं सांगितलं… अशात त्यांनी विचारण्यात आलेलं की, ‘खऱ्या आयुष्यात मुख्यमंत्री झालात तर काय होईल?’ यावर विजय म्हणालेले, ‘मुख्यमंत्री झाल्यानंतर अभिनय कधीच करणार नाही…’

आठ वर्षांपूर्वी दिलेलं वचन, थलपथी विजय यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर पूर्ण केलं. त्यांचा शेवटचा सिनेमा ‘जना नायकन’, या वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु सेन्सॉर प्रमाणपत्राअभावी तो पुढे ढकलण्यात आला. प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार हा सिनेमा 4 जून रोजी प्रदर्शित होऊ शकतो. विजय यांनी गेल्या वर्षी सिनेमाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमात अभिनयातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केलेली. आता पुढच्या कोणत्यात सिनेमात थलपती विजय दिसणार नाहीत.

Follow Us