AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Gavaskar : हे खपवून घेणार नाही, तू प्रोफेशनल.. बुमराहची ती चूक पाहून सुनिल गावसकरना राग अनावर

Sunil Gavaskar slammed Jasprit Bumrah : IPL 2026 मध्ये जसप्रीत बुमराहच्या नो-बॉल्सने चिंता वाढवली आहे, विशेषतः लखनऊविरुद्धच्या सामन्यात त्याने टाकलेल्या तीन नो-बॉल्समुळे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

Sunil Gavaskar : हे खपवून घेणार नाही, तू प्रोफेशनल..  बुमराहची ती चूक पाहून सुनिल गावसकरना राग अनावर
सुनिल गावसकर बुमराहवर संतापलेImage Credit source: social media
| Updated on: May 05, 2026 | 3:24 PM
Share

आयपीएल 2026 चा (IPL) हा सीझन मुंबई इंडियन्स संघासाठी काही खास नाहीये आणि त्यांच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहसाठी तर काहीच सुरळीत चाललेलं नाहीये. काही महिन्यांपूर्वीपर्यंत अगदी अचूक गोलंदाजी करून भेदक मारा करणारा हा वेगवान गोलंदाज आता मुंबई इंडियन्ससाठी चमकदार कामगिरी तर करू शकतच नाहीये, आणि त्याला विकेट्स मिळण्यातही अडचणी येत आहेत. एवढंच नव्हे तर आणखी एक गोष्ट बुमराहसाठी त्रासदायक ठरत्ये ती म्हणजे, IPL 2026 मध्ये त्याने टाकलेल्या नो-बॉल्सची संख्या.

या 32 वर्षीय गोलंदाजाने IPL 2026 मध्ये आत्तापर्यंत एकूण 8 नो-बॉल्स टाकले आहेत 8.. आणि त्यापैकी 3 नो-बॉल्स तर काल, म्हणजेच सोमवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात टाकले. मात्र बुमराहची ही कामगिरी, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना अजिबात आवडलेली नाही. विशेषतः जेव्हा बुमराहने लखनऊविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना 14व्या षटकात दोन नो-बॉल्स टाकले. ते पाहून गावस्कर त्यांची निराशा लपवू शकले नाहीत, ते अतिशय वैतागले होते आणि त्यांनी थेट ऑन-एअर आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.

हे खपवून घेतलं जाणार नाही

टी20 क्रिकेटमध्ये नो-बॉल टाकणे अजिबात खपवून घेण्यासारखं नाही नाही आणि व्यावसायिक खेळाडूंनी अधिक शिस्त दाखवायला हवी, असं गावसकर म्हणावे. खरंतर काल लखनऊ विरुद्ध मुंबई असा सामना सुरू असताना, 14 व्या षटकात बॉलिंग करताना बुमरहाने तिसऱ्या चेंडूवर हिमत सिंगला बाद केलं होते, पण दुर्दैवाने तो चेंडू नो-बॉल ठरला. आणि त्यानंतर याच फलंदाजाने य चुकीचा चांगलाच फायदा उठवला आणि दमदार बॅटिंग करून 40 धावा करत लखनऊचा स्कोर 220 च्या पुढे नेला.

बुमरहाचे नो-बॉल पाहून गावसकर प्रचंड संतापले होते. त्यावेळी ते कॉमेंटरी करत होते, पण बुमराहचा खेळ, त्याचे नोबॉल्स पाहून त्यांना राग अनावर झाला. ” हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, हे चालणार नाही. तू एक प्रोफेशन क्रिकेटपटू आहेस ना.. वाईड चेंडू टाकला तर मी समजू शकतो, पण नो-बॉल टाकणं हे अगदी चुकीचं आहे आणि हे खपवून घेतलं जाणार नाही.” अशा शब्दांत गावसकर यांनी त्यांची नाराजी अगदी उघडपणे व्यक्त करत बुमराहवर टीका केली.

बुमराहला एकही विकेट नाही

विशेष म्हणजे, काल लखनऊविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. त्याने 4 षटकांत तब्बल 45 धावा दिल्या. IPL 2026 मध्ये त्याने आत्तापर्यंत, 10 सामन्यांत फक्त 3 विकेट्स घेतल्या आहेत, ही त्याच्या IPL कारकिर्दीतील सर्वात खराब कामगिरींपैकी आहे.

कालच्या सामन्याबद्दल सांगायचं झालं तर, मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊने 20 षटकांत 5 गडी गमावून 228 असा मोठा स्कोर उभारला. त्यामध्ये निकोलस पूरन (63), मिचेल मार्श (44), हिमत सिंग (40) आणि एडन मार्क्रम (31 नाबाद*) यांचा मोठा वाटा होता.

त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यास मैदानाता उतरलेल्या मुंबई इंडियन्सने 6 गडी राखून हे टार्गेट गाठत विजय मिळवला. रोहित शर्माचा 84 धावा आणि रायन रिकेल्टनच्या 83 धावांच्या शानदार खेळीमुळे मुंबई इंडियन्सने अखेर पराभवाची साकळी तोडत विजयी झेंडा फडकावला.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल