Narendra Modi On Baramati | बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक, म्हणाले….
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर झालेल्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत बारामतीच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर झालेल्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत बारामतीच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे. या विजयानंतर बारामती शहरासह परिसरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते आणि समर्थकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत असून विविध ठिकाणी अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. विशेषतः इंदापूर चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमुळे या विजयाची चर्चा अधिक रंगली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे कौतुक केले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या या यशामुळे बारामतीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून निवडणुकीपूर्वीच सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मतदारांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना भरघोस मतांनी विजयी केले. या निकालामुळे बारामतीमध्ये पवार कुटुंबाचा प्रभाव कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचे चित्र आहे.
Published on: May 04, 2026 07:50 PM
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ

