AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mamata Banerjee: भवानीपूर तर हक्काचा गड; तरीही का हरल्या ममता बॅनर्जी? कधीकाळच्या साथीदारानेच असा केला सुपडा साफ

West Bengal Assembly Election Results 2026: ममता बॅनर्जी यांना भवानीचा आशीर्वाद का नाही मिळाला याची जोरदार चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. भवानीपूर मतदारसंघ हा दीदींचा बालेकिल्ला, तरीही त्या का हरल्या? सुवेंदु अधिकारी यांनी कसा लावला गडाला सुरूंग?

Mamata Banerjee: भवानीपूर तर हक्काचा गड; तरीही का हरल्या ममता बॅनर्जी? कधीकाळच्या साथीदारानेच असा केला सुपडा साफ
पश्चिम बंगाल, ममता बॅनर्जीImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 05, 2026 | 9:28 AM
Share

West Bengal Assembly Election Results 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपने ममता बॅनर्जीला जोर का धक्का दिला आहे. दीदींकडून केवळ पश्चिम बंगालची सत्ताच हिसकावली नाही तर त्यांच्या हक्काचा मतदारसंघ भवानीपूरही त्यांनी हिसकावला. भवानीपूर मतदारसंघ हा दीदींसाठी सेफ झोन मानल्या जात होता. गेल्या निवडणुकीत नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांचा जोरदार पराभव झाला होता. त्यानंतर भवानीपूर मतदारसंघातून त्या विजयी झाल्या होत्या. पण यंदा पश्चिम बंगालमध्ये दीदींचा खेला करण्यात भाजपला मोठे यश आले आहे.

भवानीपूर हे तर ममता बॅनर्जींचे माहेरघर

भवानीपूर विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा गढ होता. ही जागा त्यांच्यासाठी खास आहे. या मतदारसंघातील कालीघाट या परिसरात त्यांचे घर आहे. येथेच युथ काँग्रेसमधून त्यांची एंट्री झाली. त्यानंतर दीदींनी डाव्यांना सत्तेतून बाहेर फेकले. आज त्याच सत्तेच्या बाहेर झाल्या. गेल्या 15 वर्षांपासून त्यांची पश्चिम बंगालमध्ये एक हाती सत्ता होती. या निवडणुकीत ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघात पराभूत झाल्या.

कधीकाळी त्यांचा विश्वासू असलेल्या साथीदारानेच सुवेंदु अधिकारी यांनीच दीदीचा पराभव केला. 2021 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी ममता बॅनर्जींची साथ सोडली होती. रागावलेल्या दीदींनी सर्वात धडा शिकवण्यासाठी नंदीग्राम येथून निवडणूक लढण्याचे जाहीर केले. पण तो निर्णय आत्मघातकी ठरला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी सेफ झोन असलेल्या, सुरक्षित मानल्या गेलेल्या भवानीपूर मतदारसंघातून लढाई लढली. पण येथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. काल सोमवारी 4 मे रोजी निकाल समोर आले तेव्हा दीदींना मोठा झटका बसला. 15 हजार 105 मतांनी सुवेंदु अधिकारी यांनी दीदींचा पराभव केला. अधिकारी नंदीग्राम येथेही जिंकले.

का झाला पराभव?

दक्षिण कोलकत्ता भागात भवानीपूर मतदारसंघ येतो. या मतदारसंघात जवळपास 42 टक्के मतदार हे बंगाली आणि जवळपास 34 टक्के बंगाली नसलेले हिंदू आहेत. तर एक चतुर्थांश टक्का हा मुस्लिम मतदारांचा आहे. याशिवाय बि्हार, ओडिशा आणि झारखंडमधील लोक या भागात वसलेले आहे. यंदा हिंदू मतदारांनी सुवेंदु अधिकारी यांच्या बाजूने मतदान केल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.

ममता बॅनर्जी यांच्या पराभवात शहरातील मध्यमवर्गीयांचा टक्का अधिक मानल्या जात आहे. तृणमूल सरकारने या वर्गासाठी कोणतेही नवीन धोरण राबवले नाही. सरकारच्या कामकाजात संथपणा आला. मध्यमवर्गाची अनेक कामं लवकर आणि वेळेत पूर्ण होत नसल्याचा रोष टीएमसीला पत्कारावा लागला. गैर बंगाली हिंदूंची संख्या अधिक आणि अपार्टमेंट कल्चरचा थेट परिणाम टीएमसीच्या मोहल्ला नेटवर्कवर पडला. ममता बॅनर्जी ही आपली मुलगी आहे हे मोहल्ला नेटवर्कने बिंबले होते. भाजपने त्यालाच पाहिला सुरूंग लावला.

तर सर्वात मोठा फटका SIR चा बसला. Special Intensive Revision मुळे बोगस मतदार आणि अनेक मतदार गायब झाले. भवानीपूरमधील जवळपास 47 हजार ते 51 हजार नावं मतदारसंघातून गायब झाली. त्यात सर्वाधिक मुस्लिम असल्याचे म्हटले जात आहे. मुस्लिम मतदार हा ममता बॅनर्जी यांचा कोअर बँक मानली जाते. तिथेच पहिला घाव घालण्यात आला.

TMC ने आरोप लावलाय की SIR ने त्यांच्या परंपरागत मतदारांना गायब केले. त्यांना मतदान करण्यापासून वंचित केले. तर निवडणूक आयोगाचा दावा आहे की, दुबार मतदार आणि अयोग्य नाव हटवण्यासाठीच ही प्रक्रिया राबवण्यात आली आहे. पण त्याचा परिणाम थेट भवानीपूरमध्ये दिसला. ममता बॅनर्जी पराभूत झाल्या.

भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी लढणार हे कळताच भाजपने मोठे कार्ड टाकले. सुवेंदु अधिकारी यांना लढाईत उतरवले. त्यासाठी मोठी फिल्डिंग लावली. अनेक महिन्यांपूर्वीपासूनच या मतदारसंघात भाजपने कसून धोरण राबवले. सुक्ष्म नियोजन केले. बंगाली हिंदूसोबतच हिंदी भाषिक व्यापारी आणि हिंदू समुदायाला जवळ करण्यात भाजप यशस्वी ठरला.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!