
ट्विंकल खन्ना आणि काजोल सध्या त्यांच्या “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” या टॉक शोमुळे चर्चेत आहेत. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रीमियर झालेल्या या शोमध्ये आता जान्हवी कपूर आणि करण जोहर गेस्ट म्हणून आलेले दिसत आहेत. या एपिसोडचा प्रोमो देखील आता रिलीज झाला आहे. मुलाखतीदरम्यान वैयक्तिक आयुष्याबद्दल गोष्टींबद्दल चर्चा करण्यात आली. लग्न, अफेअरपासून ते विवाहबाह्य संबंधांपर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
फसवणूकीकडे दुर्लक्षित करून तिचे लग्न टिकवून ठेवण्याचा ट्विंकलचा जान्हवीला सल्ला
काजोल आणि ट्विंकलने या जोडीला नात्यांमधील फसवणुकीबद्दल करण आणि जान्हवीला प्रश्न विचारला. त्यावर जान्हवीने जे उत्तर दिले त्यावर ट्विंकल खन्नाने तिला चक्क फसवणूकीकडे दुर्लक्षित करून तिचे लग्न टिकवून ठेवण्याबद्दल एक अनोखा सल्ला दिला, जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. शारीरिक फसवणूकीबद्दल, ट्विंकल खन्नाने सांगितले की याचा तिच्यावर फारसा परिणाम होत नाही, परंतु भावनिक फसवणूक अधिक त्रासदायक आहे.
तर….लग्नानंतर प्रेम सर्वात आधी कमी होते
काजोल आणि ट्विंकलने करण आणि जान्हवीला प्रश्न विचारला की, “लग्नात सर्वात जास्त काय महत्त्वाचे आहे? प्रेम की सुसंगतता म्हणजे कम्पॅटिबिलिटी?” जान्हवीने प्रेम हे उत्तर दिले. दरम्यान, काजोल आणि करण जोहर यांनी सुसंगततेवर भर दिला. काजोल म्हणाली, “प्रेम कधीही सुसंगततेशिवाय टिकू शकत नाही. जर सुसंगतता नसेल तर लग्नानंतर प्रेम सर्वात आधी कमी होते.” करणनेही अभिनेत्रीच्या उत्तराचे समर्थन केले.
जान्हवीने म्हटले की शारीरिक फसवणूक जास्त त्रासदायक
त्यानंतर त्यांनी भावनिक फसवणूकीबद्दल करण आणि जान्हवीला प्रश्न विचारला. कि त्यांच्यासाठी शारीरिक फसवणूक महत्त्वाची आहे की भावनिक. इतर सर्वजण म्हणाले की भावनिक फसवणूक जास्त महत्त्वाची आहे. परंतु जान्हवी कपूर एकमेव होती जिने म्हटले की शारीरिक फसवणूक जास्त त्रासदायक आहे. जर तिच्या जोडीदाराने असे केले असेल तर ते डील ब्रेकर आहे.
रात गई बात गई
त्यावर तिला ट्विंकल खन्नाने सल्ला देत म्हटलं की, ‘आपण पन्नाशीत आहोत आणि ती फक्त विशीत. ती लवकरच या वर्तुळात प्रवेश करेल. आपण जे पाहिले ते तिने पाहिलेले नाही. रात गई बात गई.” ट्विंकल खन्नाने केलेले हे वक्तव्य थेट अक्षय कुमारच्या विवाहबाह्य संबंधांकडे थेट इशारा करतं.
दरम्यान ट्विंकलच्या या सल्ल्याबद्दल तिला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं. करण जोहर आणि काजोलने देखील ट्विंकलला पाठिंबा दिला आणि त्यामुळे त्यांच्यावरही टीका होताना दिसते. तसेच नेटकऱ्यांनी जान्हवीच्या उत्तराला पाठिंबा दिला आहे.