
हिंदी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक उदित नारायण यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आतापर्यंत त्यांनी बॉलिवूडसाठी अनेक गाणी गायली आहे. उदित नारायण यांनी सलमान खान पासून शाहरुख खान पर्यंत अनेक कलाकारांसाठी गाणी गायली आहेत. पण आता उदित नारायण एका व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सोशल मीडियावर उदित नारायण यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये उदित नारायण एका महिला चाहतीच्या ओठांना किस करताना दिसत आहेत.
व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केला. लाईव्ह शो सुरु असताना उदित नारायण यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आलेल्या महिलेच्या ओठांवर उदित नारायण यांनी किस केलं. शोमधील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Udit narayan, tham jao sir. 😭😭 pic.twitter.com/AtIYhYt6ZX
— Prayag (@theprayagtiwari) January 31, 2025
सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. उदित नारायणच्या या कृतीवर काहींचा विश्वास बसत नाही. त्याच वेळी, काही वापरकर्ते या कृत्याबद्दल गायकाला फटकारताना दिसत आहेत.सोशल मीडियावर वादग्रस्त वातावरण निर्माण झाल्यानंतर व्हिडिओवर उदित नारायण यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
Udit narayan, tham jao sir. 😭😭 pic.twitter.com/AtIYhYt6ZX
— Prayag (@theprayagtiwari) January 31, 2025
उदित नारायण म्हणाले, ‘आम्हाला पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. आम्ही सभ्य लोकं आहोत. चाहते फक्त आमच्यावर प्रेम व्यक्त करत असतात. असं असताना या गोष्टीची चर्चा का करायची? गर्दीत बरेच लोकं आहेत आणि आमचे बॉडीगार्ड देखील आहेत. पण चाहत्यांना भेटण्याची संधी मिळतेय असं वाटतं म्हणून कुणी हात पुढे करतात तर कुणी हाताचं चुंबन घेतात… हा सगळा उत्साह आहे. याकडे एवढं लक्ष देऊ नका… असं म्हणत उदित नारायण यांनी स्पष्टीकरण दिलं.
व्हिडीओवर कमेंट करत एक युजर म्हणाला, ‘उदित नारायण… थांबा सर’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काय गैरवर्तन आहे, उदित नारायण खरंच असं करू शकतात?’ अनेकांनी उदित नारायण यांच्यावर संताप व्यक्त केला, तर अनेकांनी त्यांची बाजू घेतली आहे.