AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उदित नारायण यांनी श्रेया घोषाल, अलका याज्ञिक यांनाही केलं होतं किस; चकीत झाल्या होत्या गायिका

प्रसिद्ध गायक उदित नारायण हे त्यांच्या एका व्हिडीओमुळे चांगलेच वादात सापडले आहेत. भर कॉन्सर्टमध्ये एका चाहतीला किस करतानाचा त्यांचा हा व्हिडीओ होता. त्यानंतर आता त्यांचे इतरही जुने व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उदित नारायण यांनी श्रेया घोषाल, अलका याज्ञिक यांनाही केलं होतं किस; चकीत झाल्या होत्या गायिका
उदित नारायण, अल्का याज्ञिक आणि श्रेया घोषालImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 02, 2025 | 12:00 PM
Share

गायक उदित नारायण सध्या त्यांच्या एका वादग्रस्त व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या व्हिडीओमध्ये ते लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान एका चाहतीच्या ओठांवर किस करताना दिसून येत आहेत. शनिवारी सकाळपासून त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. इतक्या मोठ्या गायकाला अशा प्रकारचं वागणं शोभून दिसत नाही, अशी टीका नेटकऱ्यांनी केली. याचदरम्यान उदित नारायण यांचे आणखी काही जुने व्हिडीओसुद्धा चर्चेत आले आहेत. यामध्ये ते प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल आणि अलका याज्ञिक यांना अचानक किस करताना दिसून येत आहेत.

यातील एक व्हिडीओ पुरस्कार सोहळ्यातील असून गायक उदित नारायण त्यावेळी मंचावर उभे असतात आणि श्रेया घोषाल पुरस्कार घेण्यासाठी मंचावर येते. तेव्हा उदित नारायण हे अचानक श्रेयाच्या गालावर किस करतात. यावेळी श्रेयाच्या चेहऱ्यावर चकीत झाल्याचे भाव सहज दिसून येतात. त्याचप्रकारे ते अलका याज्ञिक यांच्याही गालावर किस करतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्यांची तुलना अभिनेता इमरान हाश्मीशी केली आहे. ‘उदित हाश्मी’ असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. तर ‘जमान्यासोबत चालत आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

दरम्यान एका आंतरराष्ट्रीय कॉन्सर्टमधील उदित नारायण यांचा जुना व्हिडीओ शनिवारी सकाळपासून सोशल मीडियावर चर्चेत आला. यामध्ये ते स्टेजवर परफॉर्म करताना काही चाहते त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी येतात. यावेळी एक चाहती आधी त्यांच्या गालावर किस करते. त्यानंतर उदित तिच्या ओठांवर किस करतात. त्यांच्या अशा वागण्यावरून बरीच टीका होत आहे. मात्र मी कोणतंही लज्जास्पद कृत्य केलं नसल्याचं उदित यांनी म्हटलंय.

“इतका जुना व्हिडीओ आता कसा काय व्हायरल होतो? हे संशयास्पद आहे माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी हे केलं जातंय. पण तुम्ही मला कितीही खाली पाडलात, तरी मी वरच जाईन. मी चुकीचं असं काहीच केलं नाही. माझे चाहते माझ्यावर प्रेम करतात आणि मीसुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी या व्हिडीओवर दिली.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा