Balasaheb Thackeray: मातोश्रीवर बोलवलं, संजय दत्तला वाचवण्यावरून वाद झाला अन्.. उज्ज्वल निकम यांचा मोठा खुलासा

Balasaheb Thackeray: सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी एका मुलाखतीमध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्त प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी पहिल्यांदा मातोश्रीवर काय घडलं हे सांगितलं.

Balasaheb Thackeray: मातोश्रीवर बोलवलं, संजय दत्तला वाचवण्यावरून वाद झाला अन्.. उज्ज्वल निकम यांचा मोठा खुलासा
Ujawal nikam
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 14, 2026 | 1:14 PM

मुंबईच्या इतिहासात 12 मार्च 1993 हा दिवस काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. या दिवशी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी भीषण बॉम्बस्फोट झाले. शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडले, अनेकजण गंभीर जखमी झाले. त्यावेळी बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे नाव समोर आले होते. संजय दत्तने बेकायदेशीर शस्त्र बाळगल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी संजय दत्त विरोधात कोर्टात लढणारे वकील उज्ज्वल निकम यांनी आता मोठा खुलासा केला आहे.

विचार प्रणाली या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, संजय दत्त माझ्याशी आदराने बोलायचा, वागायचा. त्याला शस्त्रास्त्रांच वेड होतं. वेडा मुलगा असे मी त्याला म्हणेन. बाकी फार मी त्याला किंमत दिली नाही. पण तो खटल्यात असल्यामुळे तुम्हाला पत्रकार बांधवांना एक उत्सुकता असते. बाळासाहेब ठाकरेंची कसली मदत? तशी मदत झाली असती तर… त्यांच प्रेम होतं त्याच्यावर ही गोष्ट नाकारता येणार नाही. आणि मदत झाली असती तर गेला असता का तो जेलमध्ये? आणि उज्वल निकमला तुम्ही सोडलं असतं का? असा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही.

Loading...

त्यांचं पुत्र प्रेम…

पुढे ते म्हणाले की, बाळासाहेब आणि माझी भेट झाली होती. त्यांचं पुत्र प्रेम त्यांच्या डोक्यावर होतं. त्यांनी घरी बोलवलं होतं. बऱ्याच गोष्टी झाल्या. दोन दोन शब्द झाले. मी जळगावला घरी परत जायला निघालो होतो. रागाने त्यांनी काढूनच टाकलं होत ना. पण गोपीनाथ मुंढेंनी त्यात हस्तक्षेप केला होता. त्यांनी थांबा सांगितलं. बऱ्याच गोष्टी आहेत त्यात. पण नंतर कधी संबंध नाही आला.

उज्ज्वल निकम म्हणाले की, ठिक आहे ना. वरती एका पक्षाचे राज्य होते काँग्रेसचे. खाली काँग्रेसचे राज्य होते. बाळासाहेब ठाकरेंचे पूत्र प्रेम होतं. या सगळ्या गोष्टी होत्या. नाही असं नाही. पण काही गोष्टी बोलायच्या नसताता. मी तु्म्हाला असं सागू शकतो की काय झालं? मग असं झालं.. उज्वल निकमला असा त्रास झाला.. काय होईल? तुमची सहानभूती प्राप्त करुन मला मोठं व्हायचं नाही. सीस्टीममध्ये अशा गोष्टी घडत असतात. त्यामुळे सीस्टिमला बदनाम करायचे नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us