
मुंबई : उर्फी जावेद हे सध्या तूफान चर्चेत असलेले एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे मोठ्या वादात अडकताना दिसते. उर्फी जावेद हिच्या विरोधात काही दिवसांपूर्वीच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी थेट पोलिसांमध्ये धाव घेतली. इतकेच नाही तर उर्फी जावेद हिच्या विरोधात चित्रा वाघ यांनी तक्रार (Complaint) देखील दाखल केली. यानंतर बरीच दिवस उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये सोशल मीडियावर एक वाॅर रंगताना दिसला. उर्फी जावेद हिच्यावर कायमच तिच्या कपड्यांमुळे जोरदार टिका होताना दिसते.
उर्फी जावेद हिला बऱ्याच वेळा तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या या मिळाल्या आहेत. मात्र, उर्फी जावेद हिच्यावर मिळणाऱ्या धमक्यांचा अजिबातच परिणाम होत नाही. उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये तिच्या अतरंगी स्टाईलने एक खास ओळख ही नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद ही कधी काय कपडे घालेल हे सांगणे देखील कठीण आहे.
नुकताच उर्फी जावेद हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमुळेच आता उर्फी जावेद चर्चेत आलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना उर्फी जावेद ही दिसली आहे. उर्फी जावेद हिचे बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला. उर्फी जावेद म्हणाली की, मला काही दिवसांपूर्वीच एका वेब सीरिजची आॅफर आली. मी त्या वेब सीरिजला करण्यास होकार देखील दिला.
उर्फी जावेद म्हणाली की, त्या वेब सीरिजमध्ये काही इंटिमेट सीन देखील होते. मात्र, मी ते करण्यास सुरूवातीला नकार दिला. मात्र, जेंव्हा मी सेटवर पोहचले त्यावेळी निर्मात्याने जबरदस्ती माझे कपडे फाडले आणि मला ते सीन करण्यास भाग पाडले. या प्रकारानंतर उर्फी जावेद हिने काही तक्रारी देखील दाखल केल्या. मात्र, दबावामुळे उर्फी जावेद हिला त्या तक्रारी मागे घ्यावा लागल्याचे देखील उर्फीने सांगितले.
विशेष बाब म्हणजे त्या वेब सीरिजमध्ये उर्फी जावेद ही मुख्य भूमिकेत होती. उर्फी जावेद हिने सांगितले की, चक्क निर्मात्यानेच मागे कपडे फाडले. उर्फी जावेद हिच्या या मुलाखतीमुळे जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. उर्फी जावेद हिला बऱ्याच वेळा तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या या मिळतात.
उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. उर्फी जावेद ही लवकरच एकता कपूर हिच्या चित्रपटामध्ये दिसणार असल्याची देखील जोरदार चर्चा आहे. यावर मात्र, एकता कपूर हिने भाष्य केले नाही.