
उर्फी जावेद …हे नाव घेताच समोर येतात ते चित्रविचित्र कपडे, अतंरगी फॅशन सेन्स आणि बेधडक वक्तव्य. सतत चर्चेत राहण्याचं कसब उर्फीला चांगलंच अवगत आहे. लोकांचं लक्ष कसं वेधून घ्यायचं हेही तिला नीट माहिती आहे. मात्र तिच्या अजब ड्रेसेसमुळे उर्फी बऱ्याच वेळा सोशल मीडियावर ट्रोल होत असते. पण तरीही ती त्याकडे दुर्लक्ष करून तिचं काम करतच राहते. आता याच उर्फीच्या लेटेस्ट पोस्टमुळे खळबळ माजली आहे. उर्फी जावेद चक्क नोकरी शोधत्ये. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक रेझ्युमे शेअर केला असून नोकरीची मागणी केली आहे.
काय आहे उर्फीची मागणी ?
उर्फी जावेद हिने इन्स्टाग्रामच्या तिच्या ऑफिशिअल अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. तिने तिचा फोटो आणि रेझ्युमे शेअर करत एक पोस्टही लिहीली आहे. ‘ रिसेप्शनिस्ट म्हणून काम करण्यास तयार आहे!!! हो, मी नोकरी शोधत आहे… कारण 31 मे खरोखर जवळ आला आहे आणि माझा फॅशन इन्फ्लुएन्स धोक्यात आहे. सध्या मला माझ्या भुकेल्या पोटाची काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, कोणत्याही सूचनांचे कौतुक केले जाईल ! 31 मे पूर्वी नवीन नोकरी शोधण्यासाठी मला मदत करा!! ‘ अशी कॅप्शनही तिने लिहीली आहे.
चाहत्यांनीही केल्या भन्नाट कमेंट्स
उर्फीने तिच्या इंटरेस्टिंग रेझ्यमुमध्ये सुद्धा मजेशीर गोष्टी लिहील्या आहेत. ‘जर मी ट्रोल्स हँडल करू शकते तर तुमचे फोनही सांभाळू शकते. ‘ तिचा हा रेझ्युमे आणि पोस्ट्सवर चाहत्यांनीही खूप मजेशीर पोस्ट्स केल्या आहेत. काहींनी तर तिला चक्क नोकरीची ऑफरही दिली आहे. पण काही लोकांनी नेहमीप्रमाणे तिला ट्रोलच केलंय.
बिग बॉसमधून ओटीटीवर मिळाली प्रसिद्धी
सोशल मीडिया सेन्सेशन असलेल्या उर्फीने अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरची सुरुवात मेरी दुर्गा, सात फेरो की हेरा फेरी, कसौटी जिंदगी की आणि इतर अनेक शोमधून केली. बिग बॉस ओटीटीमध्ये स्पर्धक म्हणून सामील झाल्यानंतर उर्फी एकदम लाईमलाइटमध्ये आली. तिच्या कपड्यांच्या खास निवडीमुळे उर्फी ही नेहमीच चर्चेत असते. मात्र काही वेळा असामान्य फॅशन सेन्समुळे उर्फीला खूप ट्रोलही व्हावे लागले. पण याचा तिच्यावर कधीच विपरीत परिणाम झाला नाही, तिने तिचं काम आणि तिचा फॅशन सेन्स कायम ठेवला. मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्फी लवकरच बॉलिवूडमध्येही डेब्यू करणार आहे.