दुसऱ्या पत्नीसोबत प्रेमाचे क्षण, उर्मिलाच्या पूर्व पतीने शेअर केला रोमँटिक Video

उर्मिला मातोंडकरचा पूर्व पती मोहसिन अख्तर मीर याने निधा भट्टसोबतच्या दुसऱ्या लग्नानंतर नवे आयुष्य सुरू केलं आहे. त्याच्या निकाह आणि हनिमूनचे रोमँटिक क्षण दर्शवणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात मोहसिन आणि निधा यांची सुंदर केमिस्ट्री दिसत आहे.

दुसऱ्या पत्नीसोबत प्रेमाचे क्षण, उर्मिलाच्या पूर्व पतीने शेअर केला रोमँटिक Video
मोहसिनने शेअर केला सुंदर व्हिडीओ
| Updated on: Aug 08, 2026 | 2:36 PM

बॉलिवूडची ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिचा एक्स-हसबंड मोहसिन अख्तर मीर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण उर्मिला नाही, तर त्याची नवी प्रेमकहाणी आहे ! उर्मिलासोबत घटस्फोटानंतर मोहसिनने आयुष्यात नवी सुरुवात केली असून, काही महिन्यांपूर्वी त्याने दुसरं लग्न केलं. त्यांच्या निकाहचे फोटोही समोर आले होते. आता मोहसीनने एक सुंदर व्हिडीओ शेअर केला असून, पत्नी निधा भट्टसोबतचे त्याचे रोमँटिक क्षण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यांच्या या व्हिडीओची बरीच चर्चाही होत आहे.

मोहसिनने नुकताच इन्स्टाग्रामवर आपल्या लग्नाचा आणि हनिमूनचा एक अनसीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मोहसिन आणि निधा यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. कधी मोहसिन निधाला आपल्या मिठीत घेताना दिसतो, तर कधी दोघे निसर्गरम्य वातावरणात एकमेकांसोबत प्रेमाचे क्षण एन्जॉय करताना दिसतात.

निकाहमध्येही दिसला खास अंदाज

या व्हिडिओमधील आणखी एक क्षण सध्या लक्ष वेधून घेत आहे. निकाहच्या वेळी मोहसिन पत्नी निधासमोर डोके झुकवताना दिसतो. त्याचा हा अंदाज पाहून चाहत्यांनाही दोघांच्या नात्यातील प्रेमाची झलक पहायला मिळत आहे. मोहसिन आणि निधाचा हा रोमँटिक अंदाज पाहून सोशल मीडियावर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. दोघांची केमिस्ट्री पाहता, ‘या जोडीला कोणाची नजर लागू नये’, असंच म्हणावंसं वाटतं!

 

उर्मिला-मोहसिनचं लग्नही होतं चर्चेत

दरम्यान, मोहसिन अख्तर मीर आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी 2016 मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाने त्यावेळी बॉलिवूडमध्ये मोठी चर्चा रंगली होती. उर्मिलापेक्षा मोहसिन जवळपास 10 वर्षांनी लहान असून, दोघांचं लग्न आंतरधर्मीय असल्यानेही त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र दोघांनीही या टीकेकडे दुर्लक्ष करत आपलं नातं जपण्याचा प्रयत्न केला. अखेर लग्नाच्या आठ वर्षांनंतर 2024 मध्ये दोघांनी घटस्फोट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोटानंतर दोघांच्याही आयुष्याला नवा टर्न

उर्मिलापासून विभक्त झाल्यानंतर मोहसिनने 2026 मध्ये निधा भट्टसोबत दुसरं लग्न करत आयुष्याची नवी इनिंग सुरू केली. लग्नानंतर दोघे हनिमूनसाठी गेले आणि तिथले रोमँटिक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

तर दुसरीकडे, उर्मिला सध्या आपल्या करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे. घटस्फोटानंतर आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहत असल्याचं तिने अलीकडील मुलाखतीत सांगितलं आहे. भविष्यात नव्या नात्यासाठी ती खुली असल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे; मात्र सध्या करिअर आणि स्वतःसाठीचा वेळ तिच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे, असं ती म्हणाली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us