AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agrivoltaics: सोलर पॅनलची शेती, ॲग्रीव्होल्टेइक्समुळे दुहेरी उत्पन्नाची मोठी संधी

Agrivoltaics Solar Panels Farming: दुष्काळाला पुरून उरण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी विविध पर्यायांचा वापर करत आहेत. कुठे नाचणीचे पीक घेण्यात येत आहे. तर कुठे इतर प्रयोग राबवला जात आहे. ॲग्रीव्होल्टेइक्सचा कसा होईल शेतकऱ्यांना फायदा?

Agrivoltaics: सोलर पॅनलची शेती, ॲग्रीव्होल्टेइक्समुळे दुहेरी उत्पन्नाची मोठी संधी
सोलर पॅनलची शेती, ॲग्रीव्होल्टेइक्समुळे दुहेरी उत्पन्नाची मोठी संधी
| Updated on: Nov 08, 2026 | 1:55 PM
Share

Agrivoltaics Solar Panels Farming: सुपर अलनिनोमुळे राज्यातील ३०४ जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद होत आहे. पिण्याचे पाणी, शेती, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयोगशील शेतकरी सातत्याने प्रयत्न करत आहेत. शेतकरी उत्पन्न वाढीसाठी अभिनव मार्ग शोधून काढत आहेत. सौर पॅनल शेती -ॲग्रीव्होल्टेइक्स हा सध्या परवलीचा शब्द ठरत आहे. काय आहे हे तंत्रज्ञान, कसा होता शेतकऱ्यांना दुहेरी फायदा, कशी मिळते दुहेरी उत्पन्नाची मोठी संधी?

काय आहे ॲग्रीव्होल्टेइक्स?

ॲग्रीव्होल्टेइक्स म्हणजे शेतात सोलर पॅनल बसवणे आणि त्यातून वीज निर्मिती करून कमाई करणे. त्यासाठी शेतात ठराविक अंतरावर आणि ठराविक उंचीवर सोलर पॅनल बसवले जातात. सौर ऊर्जा पॅनल अशा पद्धतीने बसवण्यात येतात की ज्यामुळे त्या खाली विविध पीकही घेता येतील आणि ट्रॅक्टर, ट्रॉली, थ्रेशर आणि इतर कृषी यांत्रिकी साहित्य ठेवता येईल. विशेष म्हणजे या पॅनलखाली शेतकऱ्यांना शेती करता येते. सिंचनाची सोय असल्यास पॅनलच्या सावलीमुळे जमिनीची होणारी धूप होत नाही. मातीचा ओलावा टिकून राहतो. सौर ऊर्जा पॅनलची वीज विकून शेतकरी कमाई करू शकतो. तर पॅनल खालील शेतीतून तो उत्पन्न घेऊ शकतो. त्याचा दुहेरी फायदा होतो.

शेतकऱ्यांना असा होतो दुहेरी फायदा

दुहेरी उत्पन्न मिळते- शेतकऱ्याला शेतातून पिकांचे उत्पन्न घेता येते. सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज विक्रीचा खात्रीशीर पर्यायही उपलब्ध होतो.

पाण्याची बचत- सोलर पॅनलच्या सावलीमुळे जमिनीची कमी धूप होते. जमिनीचे तापमानही नियंत्रित राहते. जमिनीतील ओलावा टिकून राहतो. पाण्याचे बाष्पीभवनही होत नाही. पाण्याची मोठी बचत होते.

नैसर्गिक संरक्षण- कडक उन्हाळा, उष्णतेची लाट आणि गारपिटीपासून पिकांचे सोलर पॅनल्स संरक्षण करतात. हे एक प्रकारे छताचे काम करते.

या पॅनलखाली कोणती पीकं घेता येतात?- सोलर पॅनलखाली सर्वच पीकं घेता येत नाहीत. ज्या पिकांना कमी सूर्यप्रकाश लागतो. अशा पिकांचा यामध्ये समावेश होतो. पालक, मेथी, कोथिंबीरसारख्या पालेभाज्या, तर अद्रक, हळद, कांदा आणि इतर औषधी वनस्पती, काही फळझाडांचा यामध्ये समावेश होतो. काही शेतकरी, शेतातील एका भागात सोलर पॅनल शेतीचा प्रयोग राबवत आहेत. राजस्थानमधील काही भागात अशी शेती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही हा प्रयोग रूजू पाहत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शुष्क आणि कडक उन्हाच्या वातावरणात हे तंत्रज्ञान बळीराजासाठी वरदान ठरू शकते.

Follow Us
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील नेत्याच...
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ..
Diwali 2026 : भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ...
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ