उर्वशी का म्हणतेय, मूव्ह ऑन होण्याची वेळ आली.. Ind vs Pak मॅचनंतर ऑस्ट्रेलियाला रामराम

अवघ्या काही तासांत उर्वशीचा फोटो व्हायरल; पुन्हा ऋषभ पंतचं कनेक्शन?

उर्वशी का म्हणतेय, मूव्ह ऑन होण्याची वेळ आली.. Ind vs Pak मॅचनंतर ऑस्ट्रेलियाला रामराम
उर्वशी रौतेला
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 25, 2022 | 1:45 PM

मुंबई- अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. भारतीय क्रिकेट टीम जेव्हा कोणत्याही सामन्यासाठी सज्ज होते, तेव्हा उर्वशीचं नाव सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागतं. त्यामुळे जेव्हा उर्वशी टी-20 वर्ल्ड कपच्या आधी ऑस्ट्रेलियाला (Australia) पोहोचली तेव्हा त्याची जोरदार चर्चा झाली. आता पुन्हा एकदा उर्वशी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्यामागचं कारण काय ते समजून घेऊयात..

उर्वशी जेव्हा टी-20 वर्ल्ड कपच्या आधी ऑस्ट्रेलियाला पोहोचली, तेव्हा नेटकऱ्यांना वाटलं की आता सर्व सामने पाहणार आणि त्याचा आनंद लुटणार. मात्र उर्वशी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यानंतर तिथून निघाली आहे. याविषयी खुद्द उर्वशीने सोशल मीडियावर अपडेट दिली आहे.

रविवारी 23 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाचा पाकिस्तानशी महामुकाबला झाला. मेलबर्नमध्ये पार पडलेल्या या सामन्यात टीम इंडियाने दमदार विजय मिळवला. दिवाळीच्या एक दिवस आधी भारताने हा विजय मिळवल्याने सर्वांचा आनंद द्विगुणीत झाला. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी या विजयचा आनंद लुटला. हा सामना जेव्हा पार पडला, तेव्हा उर्वशी मेलबर्नमध्येच होती. मात्र भारताच्या दमदार विजयानंतर उर्वशी ऑस्ट्रेलियाहून निघाली.

उर्वशीने इन्स्टाग्रामवर फ्लाइटमधील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘इथून निघताना माझ्या मनाला खूप वाईट वाटतंय. पण पुढे जाण्याची वेळ आली आहे.’ उर्वशीच्या इतर पोस्टप्रमाणेच ही पोस्टसुद्धा अवघ्या काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

ऋषभ पंतने सामना खेळला नाही, म्हणून उर्वशी परत येतेय, असं एकाने लिहिलं. तर आता कोणाची आठवण येतेय, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत खेळला नव्हता. म्हणूनच काही युजर्स उर्वशीची मस्करी करत आहेत.