अखेरच्या दिवसांत बॉलिवूडनेही तिच्याकडे फिरवली पाठ, शव घ्यायलाही कोणी आलं नव्हतं; उर्वशी साकारणार भूमिका

| Updated on: Jun 04, 2023 | 1:28 PM

सर्वच्या सर्व हिट किंवा सुपरहिट ठरले होते. फिल्मफेअर, द स्टारडस्ट आणि बॉम्बे डाईंग यांसारख्या प्रत्येक चित्रपट मॅग्झिनच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान त्यांना मिळाला होता. जगप्रसिद्ध टाईम मासिकाच्या कव्हर पेजवर दिसणारी ती पहिली भारतीय होती. 

अखेरच्या दिवसांत बॉलिवूडनेही तिच्याकडे फिरवली पाठ, शव घ्यायलाही कोणी आलं नव्हतं; उर्वशी साकारणार भूमिका
Urvashi Rautela
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : झगमगत्या फिल्म इंडस्ट्रीच्या पडद्यामागे अशा असंख्य कथा आहेत, ज्यांनी बॉलिवूडची नकारात्मक बाजू प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. या इंडस्ट्रीत उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो आणि मावळत्या सूर्याकडे पाठ फिरवली जाते. बॉलिवूडमधल्या काही कलाकारांचा शेवट अत्यंत अनपेक्षितपणे झाला. यामध्ये अशाच एका अभिनेत्रीचा समावेश होता. 70 आणि 80 च्या दशकात ही अभिनेत्री सर्वाधिक मानधन घेत होती. इंडस्ट्रीत आणि इंडस्ट्रीबाहेर तिच्या सौंदर्याची आणि लोकप्रियतेची जोरदार चर्चा असायची. मात्र या अभिनेत्रीच्या अखेरच्या दिवसांमध्ये बॉलिवूडने तिच्याकडे पाठ फिरवली होती. इंडस्ट्रीतल्या ज्या लोकांना तिने आपलं मानलं होतं तेसुद्धा तिच्यासोबत नव्हते. अशा अभिनेत्रीची कथा आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या अभिनेत्रीची भूमिका उर्वशी रौतेला साकारणार आहे.

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत त्याबद्दलची माहिती दिली. ‘बॉलिवूड अपयशी ठरलं पण तुम्हाला गर्व वाटेल अशी कामगिरी मी करणार आहे’, असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला आहे. उर्वशी साकारत असलेली ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून परवीन बाबी आहे. या चित्रपटात परवीन बाबी यांच्या फिल्मी करिअरसोबतच त्यांचं खासगी आयुष्यसुद्धा दाखवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

22 जानेवारी 2005 रोजी परवीन बाबी राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या निवासी सोसायटीच्या सचिवाने पोलिसांना सूचना दिली होती, की तीन दिवसांपासून परवीन बाबी यांच्या दारातील किराणा आणि वृत्तपत्र तसेच पडून आहेत. मृतदेह सापडण्याच्या 72 तासांआधीच तिचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. परवीन यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालं नव्हतं. कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा त्यांच्या पोटात तीन दिवसांपासून अधिक काळ अन्नाचा एकही कण गेला नसल्याचं दिसून आलं होतं. परंतु काही प्रमाणात अल्कोहोल (शक्यतो औषधातून पोटात गेलेली) सापडली होती.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत परवीन बाबी यांनी जवळपास आठ चित्रपट केले होते. सर्वच्या सर्व हिट किंवा सुपरहिट ठरले होते. फिल्मफेअर, द स्टारडस्ट आणि बॉम्बे डाईंग यांसारख्या प्रत्येक चित्रपट मॅग्झिनच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान त्यांना मिळाला होता. जगप्रसिद्ध टाईम मासिकाच्या कव्हर पेजवर दिसणारी ती पहिली भारतीय होती.