AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Usha Nadkarni: उषा नाडकर्णी शारीरिक हिंसेच्या ठरलेल्या बळी, म्हणाल्या, ‘कुऱ्हाडीने मारलं आणि…’

Usha Nadkarni: उषा नाडकर्णी यांचा धक्कादायक खुलासाला, शारीरिक हिंसेच्या ठरल्या बळी, म्हणाल्या, 'कुऱ्हाडीने मारलं आणि...', उषा नाडकर्णी यांनी खासगी आयुष्यावर केला मोठा खुलासा..., सर्वत्र त्यांचीच चर्चा...

Usha Nadkarni: उषा नाडकर्णी शारीरिक हिंसेच्या ठरलेल्या बळी, म्हणाल्या, 'कुऱ्हाडीने मारलं आणि...'
फाईल फोटो
| Updated on: Aug 24, 2025 | 8:22 AM
Share

Usha Nadkarni: ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत सविता देशमुख ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना आज कोणत्याचं ओळखीची गरज नाही. फक्त मराठीच नाही तर, त्यांनी हिंदी सिनेमाविश्वात देखील स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे. पण हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी लहानपणी घडलेल्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या. त्यांनी त्यांच्या आई – वडिलांबद्दल फार काही सांगितलं. त्याचे वडील हवाई दलातील अधिकारी होते. त्यामुळे ते प्रचंड शिस्तप्रिय आणि कडक शिस्तीचे होते.

उषा नाडकर्णी म्हणाल्या, ‘ते खूप कडक होते…., ते प्रचंड हिंसक देखील होते. आम्ही भावंड त्यांना घाबरायचो… आमच्यामध्ये एकाला मारलं तर, दोघे पळून जायचे…. एकदा माझ्या भावाला काही कारणामुळे वडिलांनी मारलं होतं आणि मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला… तेव्हा त्यांनी मला कुऱ्हाडीने मारलं… माझ्या हाताला जखम झालेली आणि दुसऱ्या दिवशी माझं नाटक होतं. तेव्हा जखमी अवस्थेत मी रंगमंचावर होते…’

पुढे नाडकर्णी म्हणाल्या, ‘वडील मारत असताना एकदा तर माझा भाऊ बेशुद्ध झाला… वडील अनेकदा थोड्या प्रेमाने राग शांत करण्याचा प्रयत्न करायचे. एवढंच नाही तर, मारल्यानंतर आमच्यासाठी आमच्या आवडीची आईस्क्रिम देखील आणायचे…’, उषा नाडकर्णी कायम त्यांच्या बालपणाबद्दल सांगत असतात…

उषा नाडकर्णी यांचे वडील लहान – लहान चुकांवर रागवायचे… यावर अभिनेत्री म्हणाल्या, ‘जर त्यांना वर्तमानपत्र दुमडलेलं दिसकं की ते रागवायचे आणि वर्तमानपत्र फाडायचे… आमच्या शाळेतील पुस्तकं देखील योग्य प्रकारे ठेवले नसतील तर ते फाडून टाकायचे…माझी आई वडिलांना म्हणायची की मुलांना नवीन पुस्तकं खरेदी करायची आहेत, म्हणून ती फाडू नका. ‘

आई – वडील होते अभिनयाच्या विरोधात…

उषा नाडकर्णी यांनी सांगितल्यानुसार, आई – वडील दोघेही अभिनयाच्या विरोधात होते. मला अभिनेत्री व्हायचं आहे असं सांगितल्यानंतर ते माझ्यावर रागावले होते. माझे सर्व कपडे त्यांनी घराबाहेर फेकले होते आणि मला घराबाहेर काढलं होतं… तेव्हा एक आठवडा मी माझ्या मैत्रिणीच्या घरी राहत होती… त्यानंतर वडीलच मला घ्यायला आले… असं देखील उषा नाडकर्णी म्हणाल्या होत्या.

Follow Us
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले