सिनेमासाठी अभिनेत्रीचं लिंग बदल, वडिलांशी वैर म्हणाली, ‘वडिलांचा पाठिंबा नव्हता पण…’
Bollywood Actress: हॉटेलमध्ये काम करत होती 'ही' अभिनेत्री, सिनेमासाठी केलं लिंग बदल, वडिलांच्या विरोधात गेली... आज ती जगतेय रॉयल आयुष्य, इतक्या कोटींची आहे मालकीण, सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

Bollywood Actress: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव मोठं केलं आहे. कुटुंब बॉलिवूडमधील नसताना देखील त्यांनी मयानगरीत येऊल स्वतःच्या स्वप्नांना एक नवी फरारी दिली. आज त्या अभिनेत्री बॉलिवूडवर आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.. अशाच अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे वाणी कपूर… वाणी कपूर हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण एका सिनेमात वाणी हिने भूमिकेची गरज म्हणून लिंग बदल केलं होतं… त्यानंतर वाणी तुफान चर्चेत आली…
सांगायचं झालं तर, आज वाणी कपूर हिचा वाढदिवस आहे. म्हणू सर्वत तिची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री वाणीने पर्यटन अभ्यासात पदवी प्राप्त केली आहे. जयपूरमधील द ओबेरॉय हॉटेल्समध्ये तीन वर्षे इंटर्नशिप केल्यानंतर आणि आयटीसी हॉटेलमध्ये नोकरी केली त्यानंतर अभिनेत्रीने मॉडेलिंगच्या विश्वात एन्ट्री केली. त्यानंतर वाणी हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही…
बॉलिवूडमध्ये करीयर करण्यासाठी वाणीला तिच्या वडिलांकडून कधीच पाठिंबा मिळाला नाही. वडिलांच्या विरोधात तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. आईने मात्र लेकीची साथ कधीच सोडली नाही. वाणीने मॉडेलिंग केलेलं देखील अभिनेत्रीच्या वडिलांना आवडत नव्हतं… पण वाणीने वडिलांच्या रागाला सामोरं जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि स्वप्न पूर्ण केलं.
वाणी हिने अनेत हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. दरम्यान, वाणी हिने एका सिनेमातील भूमिकेसाठी लिंग बदल देखीलं केलं होतं. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘चंडीगढ़ करे आशिकी’ सिनेमात तिने लिंग बदल केलं होतं… सांगायचं झालं तर, ‘शुद्ध देसी रोमान्स’ सिनेमानंतर वाणीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
वाणी कपूर हिची संपत्ती…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये वाणी कपूरची संपत्ती सुमारे 10 कोटी रुपये होती. रिपोर्टनुसार, वाणी सुमारे 375 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालकीण आहे. दिल्ली आणि मुंबईत तिचं स्वतःचं घर आहे. याशिवाय अनेक महागड्या गाड्याही आहेत. सिनेमा आणि जाहिरातींच्या माध्यमातून वाणी कोट्यवधींची माया कमावते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अभिनेत्री कमाई करते.
