खऱ्या आयुष्यात का अपूर्ण राहिली अमिताभ बच्चन – रेखा यांची ‘प्रेम कहाणी’; जया कशा आल्या मध्ये?

'माझा कोणी कशला विचार करेल, मी तर बाहेरची आहे...', 'त्या' प्रसंगानंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेलं नातं संपल्यानंतर रेखा यांनी व्यक्त केलेल्या भावना आजही चर्चेत

खऱ्या आयुष्यात का अपूर्ण राहिली अमिताभ बच्चन - रेखा यांची प्रेम कहाणी; जया कशा आल्या मध्ये?
Amitabh bachchan and Rekha
| Updated on: Feb 14, 2023 | 11:40 AM

Amitabh bachchan – Rekha Love story : महानयाक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि अभिनेत्री रेखा ( rekha) यांची ‘अधुरी प्रेम कहाणी’ आज प्रत्येकाला माहिती आहे. पण आजही त्यांच्या रिलेशनशिपमधील काही गोष्टी समोर आल्या तर चाहते देखील चकित होतात. एक काळ असा होता जेव्हा रेखा – बिग बी यांच्या जोडीने मोठ्या पडद्यावर आणि चाहत्यांच्या मनात राज्य केलं. त्यानंतर रेखा – बिग बी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. दोघं एकमेकांच्या प्रचंड जवळ आले होते. पण कधीही एक होवू शकले नाहीत. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं.

रिपोर्टनुसार, १९७६ साली प्रदर्शित झालेल्या ‘दो अंजाने’ सिनेमानंतर रेखा – बिग बी यांच्यातील नातं अधिक घट्ट झालं. तेव्हा दोघांच्या केमिस्ट्रीचा अंदाज लोकांना आला. जेव्हा ‘गंगा की सौगंध’ सिनेमाच्या सेटवर रेखा यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं, तेव्हा अमिताभ बच्चन प्रचंड भडकले. त्या घटनेनंतर रेखा – बिग बी यांच्यात असलेल्या नात्याची चर्चा तुफान रंगू लागली. (Amitabh bachchan and Rekha Love story)

रेखा – बिग बी यांच्यातील नात्याबाबत जेव्हा जया बच्चन (Jaya bachchan) यांना कळालं, तेव्हा बिग बी घरात नसताना जया यांनी रेखा यांना जेवणासाठी घरी बोलावलं. रेखा घरी आल्यानंतर दोघींमध्ये गप्पा रंगल्या. जया बच्चन, रेखा यांनी काहीही वाईट बोल्या नाहीत. पण जेव्हा रेखा यांनी जया यांचा निरोप घेतला आणि फक्त एकच वाक्य बोल्या.. त्यानंतर रेखा यांना कळालं की बिग बी आपले कधीही होवू शकत नाहीत.

घरी आलेल्या रेखा यांच्या सन्मान केल्यानंतर निरोप घेताना जया म्हणाल्या, ‘मी अमिताभ बच्चन यांना कधीही सोडणार नाही..’, जया यांच्या स्पष्ट वक्तव्यानंतर रेखा आणि बिग बी त्यानंतर कधीही एकत्र दिसले नाहीत. रेखा आणि बिग बी ‘सिलसिला’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आले. सिनेमात रेखा आणि बिग बी यांच्यासोबत जया बच्चन देखील होत्या. ‘सिलसिला’ सिनेमानंतर रेखा आणि बिग बी कधीही एकत्र दिसले नाहीत. (Jaya bachchan – Amitabh bachchan)

‘सिलसिला’ सिनेमाचे दिग्दर्शक यश चोप्रा यांनी रेखा आणि बिग बी यांच्या नात्याचा खुलासा केला होता. तर रेखा, बिग बींसोबत असलेल्या नात्याबद्दल म्हणाल्या, ‘मला काय हवं आहे याची कोणाला माझी काळजी नव्हती. कारण मी बाहेरची महिला होते.’ जया यांचं नाव न घेता रेखा म्हणाल्या की, दुसरा व्यक्ती सर्वांच्या नजरेत बिचारा असतो. जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करत नाही, अशा व्यक्तीसोबत एका घरात कसं राहू शकतो… असं देखील रेखा म्हणाल्या.. (rekh feelings)