AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समर-स्वानंदीच्या आयुष्यात नवा ट्विस्ट; ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये हास्यजत्रा फेम एण्ट्री

प्रभाकर मोरे यांच्या एण्ट्रीमुळे मालिकेत विनोदासोबतच भावनिक रंगही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समर-स्वानंदीच्या आयुष्यातील हा नवा अध्याय प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा ठरणार आहे.

समर-स्वानंदीच्या आयुष्यात नवा ट्विस्ट; 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये हास्यजत्रा फेम एण्ट्री
तेजश्री प्रधान, सुबोध भावेImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 25, 2026 | 2:34 PM
Share

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली तुटेना’ सध्या एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचली आहे. समर आणि स्वानंदीच्या नात्यात प्रेमाची वीण घट्ट होत असतानाच आता मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्याची एण्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे हा अभिनेता प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’शी संबंधित आहे. त्यामुळे त्याची मालिकेतील भूमिका नेमकी काय असेल, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते प्रभाकर मोरे यांची एण्ट्री झाली आहे. झी मराठीने सोशल मीडियावर मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला असून त्यामध्ये प्रभाकर मोरे यांची झलक पाहायला मिळतेय. मात्र, ते कोणती भूमिका साकारणार आहेत, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

मालिकेच्या सध्याच्या कथानकानुसार, समर आणि स्वानंदी अष्टविनायक यात्रेसाठी निघाले आहेत. त्यांच्या नात्यातील अनेक गैरसमज मागे पडत असून दोघांमध्ये एक वेगळाच भावनिक बंध तयार होताना दिसत आहे. याच प्रवासात विघ्नेश्वराच्या दर्शनासाठी ओझर इथं पोहोचल्यानंतर त्यांच्या आयुष्यात प्रभाकर मोरे यांच्या पात्राची एण्ट्री होते. प्रोमोमध्ये प्रभाकर मोरे देवासमोर उभे राहून प्रार्थना करताना दिसतात. राजवाडे कुटुंबाच्या सुखासाठी आणि त्यांच्या घरात आनंद नांदावा, अशी इच्छा ते बाप्पाकडे व्यक्त करतात. त्यांच्या या प्रार्थनेमुळे समर आणि स्वानंदी काही क्षणांसाठी आश्चर्यचकित होतात.

पहा प्रोमो-

विशेष म्हणजे, त्यांच्या प्रार्थनेत राजवाडे कुटुंबाच्या घरात ‘गोकुळ’ फुलावं, अशी भावना व्यक्त केली जाते. त्यामुळे मालिकेतील सध्याच्या मातृत्वाच्या ट्रॅकशी या नव्या पात्राचा काही संबंध आहे का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मालिकेत सध्या स्वानंदीच्या मातृत्वाचा विषय महत्त्वाचा ठरत आहे. यापूर्वी तिच्या वयावरून आणि आई होण्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांमुळे ती भावनिकदृष्ट्या अस्वस्थ झालेली पाहायला मिळाली होती. मात्र, समरने तिची साथ देत तिच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघे अष्टविनायक यात्रेला निघाले आहेत.

आता प्रभाकर मोरे यांच्या पात्राची एण्ट्री झाल्याने या कथानकाला आणखी वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. प्रोमोमध्ये स्वानंदी स्वतःच, “राजवाड्यांच्या घराचा गोकुळ व्हावं अशी माझीही इच्छा आहे, पण यासाठी मीच अडचण तर नाही ठरणार?”, असा प्रश्न उपस्थित करते. त्यामुळे तिच्या मनातील भीती आणि समरसोबतचं नातं पुढे कसं विकसित होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील