लाज वाटेल… मान शरमेने खाली जाईल… तरुणाचं अभिनेत्री समोर महाभयंकर अश्लील कृत्य, नागरिक संतापले

एक अतिशय धक्कादायक असा प्रकार पुढे आलाय. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. एक अभिनेत्री कॅबची वाट पाहत उभी असताना तिच्यासमोर एका व्यक्तीने विचित्र चाळे केली. तो व्यक्ती फक्त तितक्यावरच थांबला नाही तर त्याने चक्क पॅंटची चईन देखील उघडली. हा प्रकार अभिनेत्रीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलाय.

लाज वाटेल... मान शरमेने खाली जाईल... तरुणाचं अभिनेत्री समोर महाभयंकर अश्लील कृत्य, नागरिक संतापले
actress
| Updated on: Aug 07, 2025 | 4:56 PM

एक अतिशय धक्कादायक आणि हैराण करणारी घटना पुढे आलीये. शहरात चक्क दिवसाढवळ्या एका अभिनेत्री आणि मॉडेलचा विनयभंग करण्यात आलाय. चेहऱ्यावर मास्क घातलेल्या तरूणाने अगोदर विचित्र चाळे केले आणि मग तो थेट त्या मॉडेलच्यासमोर हस्तमैथून करायला लागला. हा सर्व धक्कादायक प्रकार त्या मॉडेलने मोबाईमध्ये कैद केलाय. ही घटना मॉडेल कॅबची वाट पाहत असताना घडली. पीडितेने एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि आपल्यासोबत नेमके काय घडले, हे तिने स्पष्ट सांगितले. मात्र, या घटनेमुळे भितीचे वातावरण बघायला मिळतंय.

व्हिडिओमध्ये पीडित मॉडेलने सांगितले की, ती जयपूरहून परतली होती आणि सकाळी 11 वाजता गुरुग्राममधील राजीव चौकात उतरली. तिने लगेचच कॅब बुक केली. कॅबला येण्यास उशीर असल्याने ती वाट पाहत तिथेच थांबली होती. यादरम्यान एक व्यक्ती तिच्याकडे सतत पाहत होता. तिच्याकडे पाहून विचित्र हालचाल करत होता.

पीडितेने यासर्व गोष्टींकडे सुरूवातीला दुर्लक्ष केले. पीडितेकडे पाहून त्या व्यक्तीने चक्क त्याच्या पँटची चईन (झिप) उघडली आणि तिच्याकडे पाहून मग तो अश्लील कृत्ये करू लागला. तो व्यक्ती अभिनेत्रीकडे पाहून काही वेळ हस्तमैथून करत राहिला. मॉडेलने हा सर्व धक्कादायक प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. मॉडेलने म्हटले की, तो कोणत्या नशेत वगैरे अजिबात नव्हता, त्याला कळत होते की, आपण नेमके काय करतोय. तो काहीही करून मला अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करत होता.

ते सर्व पाहून मला खूप जास्त किळस येत होती. व्हिडीओमध्ये ती मॉडेल म्हणाली की, या घटनेवेळी मी खूप जास्त घाबरले होते. पण मी इतकी जास्त हतबल होते की, माझ्या हातात काहीच नव्हते, मी काहीही करू शकत नव्हते. मी जी पहिली कॅब बुक केली होती, त्या कॅबचा चालक फोनच उचलत नव्हता. मग मी दुसरी कॅब बुक केली. यादरम्यान मी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा फोन लागला नाही.

मी हेल्पलाइनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. हेच नाही तर जवळच्या पोलिस स्टेशनचा नंबरही गुगलवर शोधला. यानंतर तक्रार देण्यासाठी स्टेशनमध्ये येण्यास मला सांगण्यात आल्याचे तिने म्हटले. आता या प्रकरणात पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध घेतला जातोय. व्हिडीओमध्ये तो व्यक्ती स्पष्ट दिसत आहे, पण त्याने तोंडावर मास्क घातले आहे. मॉडेलने पोलिसांवर देखील संताप व्यक्त केला आहे.