AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil Event : भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले आमचे असे रक्षक...'

Gautami Patil Event : भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, ‘हे BJP वाले आमचे असे रक्षक…’

| Updated on: Dec 11, 2025 | 4:05 PM
Share

भारतीय जनता पक्षाने (भाजप) आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र विरोध दर्शवला आहे. कांदिवलीमध्ये अशा गंभीर घटनेची पार्श्वभूमी असताना भाजपने मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करणे हे संतापजनक असल्याची भूमिका मनसेने घेतली आहे.

भारतीय जनता पक्षाने (भाजप) कांदिवलीत आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र विरोध दर्शवला आहे. कांदिवलीत नुकतीच एका मुलीवर अत्याचाराची घटना घडलेली असताना भाजपने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे हे अत्यंत संतापजनक आणि असंवेदनशील असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसेने सत्ताधारी पक्षांवर टीका करताना म्हटले आहे की, एकीकडे मुलीवर अत्याचार होत आहेत आणि दुसरीकडे भाजप गौतमी पाटीलला कार्यक्रमात आणून नाचवत आहे, यावर त्यांना लाज वाटत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईतील कांदिवली येथे एका पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या गंभीर घटनेनंतर राजकीय पक्ष आक्रमक झाले असून, ठाकरे गटाच्या शिवसेनेने तातडीने कारवाईची मागणी करत कांदिवली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर, तसेच संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे. सरकारला त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेची आठवण करून देत, अशा घटना घडत असताना त्यांची भूमिका काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Dec 11, 2025 04:05 PM