भारताची सगळी टीम नशा करते, रिवाबा जडेजा यांच्या खुलाशाने खळबळ; म्हणाल्या माझे पती सोडून…
क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांनी भारतीय क्रिकेट संघाविषयी मोठा दावा केला आहे. या दाव्यानंतर आता एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी खेळाडूंवर मोठे आरोप केले आहेत.

Rivaba Jadeja : क्रिकेट आणि राजकारण ही दोन अशी क्षेत्रे आहेत ज्यामध्ये पैसा, पद आणि प्रतिष्ठा यांचं मोठं वलय आहे. राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्तीचे तसेच क्रिकेटर यांचे लाखो चाहते असतात. क्रिकेटर्सचे राहणीमान, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनेकजण नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. काही-काही तरुण-तरुणींसाठी तर हे क्रिकेटर प्रेरणास्थान असतात. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजा याची पत्नी तथा गुजरातच्या शिक्षणमंत्री रिवाबा जडेजा यांनी खळबळ उडवून देणारं विधान केलं आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट संघावर धक्कादायक असा आरोप केला असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आपल्या पतीला म्हणजेच रविंद्र जडेजाला वगळून त्यांनी इतर खेळाडूंवर हे आरोप केले आहेत. रिवाबा जडेजा यांनी केलेल्या आरोपांचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.
रिवाबा जडेजा नेमकं काय म्हणाल्या?
मिळालेल्या माहितीनुसार रिवाबा जडेजा यांचा सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. साधारण महिन्याभरापूर्वी हा कार्यक्रम पार पडला होता. जामनगरमधील दीपसिंहजी ध्रोल भयात राजपूत वसतिगृह विद्या सन्मान समारंभ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आपल्या भाषणात त्यांनी स्त्री-पुरुष असमानता, लहान मुलांना संस्कारांची गरज किती आहे, मुलींना ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात तसेच प्रश्न मुलांनाही विचारणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. याच भाषणात त्यांनी भारतीय क्रिकेट संघातील व्यसाबाबत मोठं विधान केलं आहे.
रिवाबा जडेजा नेमकं काय म्हणाल्या?
रिवाबा जडेजा यांनी मुलांनी व्यसन करू नये, असे आवाहन केले. हे सांगताा त्यांनी त्यांचे पती रविंद्र जडेजा याचे उदाहरण दिले. माझे पती रविंद्र जडेजा हे व्यसन करत नाहीत. ते ऑस्ट्रिलिया, लंडन, दुबई अशा परदेशात क्रिकेट खेळण्यासाठी जातात. पण तिथे गेल्यानंतर ते कोणतेही व्यसन करत नाहीत. बाकीची भारतीय टीम मात्र व्यसन करते, असे रिवाबा जडेजा यांनी म्हटले आहे. याच विधानामुळे रिवाबा जडेजा यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. रिवाबा जडेजा यांनी भारतीय संघावर बोलताना जपून बोलायला हवे, असे मत काही लोक व्यक्त करत आहेत.
