Hydrogen Train: देशाच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनची वैशिष्ट्ये काय, किती डबे ? सर्व माहिती जाणून घ्या
India's First Hydrogen Train: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती देताना सांगितले की हायड्रोजन ट्रेन सेट हा सर्वात लांब आणि सर्वाक शक्तीशाली हायड्रोजन ट्रेन सेट आहे. हा ट्रेन सेट संपूर्णपणे स्वदेशी रुपाने डिझाईन आणि विकसित केला आहे.

भारतीय रेल्वेने देशाच्या पहिल्या हायड्रोजनवर धावणाऱ्या ट्रेन संदर्भात मोठे पाऊल पुढे टाकले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले की पहिली हायड्रोजन ट्रेन सेटची निर्मिती पूर्ण झालेली आहे. रिसर्च,डिझाईन एण्ड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO)ने निर्धारित मानकांवर आधारीत ही ट्रेन सेट विकसित केली आहे. आता ट्रेनसाठी लागणाऱ्या हायड्रोजनसाठी हरयाणा येथील जींदमध्ये इलेक्ट्रोलिसिस प्रक्रिया आधारित ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्लांट देखील स्थापन करण्यात आला आहे.
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की हा हायड्रोजन ट्रेन सेट सर्वात लांब आणि सर्वात शक्तीशाली हायड्रोजन ट्रेन सेट आहे.तसेच हा ट्रेन सेट संपूर्णपणे स्वदेशी रुपात डिझाईन आणि विकसित केला आहे. हे सरकारचे आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक पाऊल असून भारतीय रेल्वेने स्वत: हा ट्रेन सेट डिझाईन केलेला आहे.
जगातील सर्वात लांब आणि ताकदवान हायड्रोजन ट्रेन
रेल्वे मंत्र्यांच्या मते हे देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन-सेट जगातील सर्वात लांब ( १० डबे ) आणि ब्रॉड गेजवर चालणारी सर्वात शक्तीशाली (2400 kW) हायड्रोजन ट्रेन-सेट आहे.या ट्रेन – सेटमध्ये दोन ड्रायव्हींग पॉवर कार (DPC) सामील आहेत. ज्यांची क्षमता 1200 kW प्रति पॉवर कार म्हणजे एकूण 2400 kW इतकी जास्त आहे.
हायड्रोजन ट्रेनमध्ये 8 पॅसेंजर कोच
हायड्रोजन ट्रेनमध्ये एकूण 8 पॅसेंजर कोच लावण्यात आले आहेत. पर्यावरणाच्या अनुकूल तंत्रज्ञानाचा यात वापर केलेला आहे. हायड्रोजन संचालित ट्रेन सेट संपूर्णपण झिरो कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन करतो. आणि याचा एकमेव उत्सर्जन जलबाष्प आहे. ही नेस्क्ट जनरेशन रेल्वे फ्युएल टेक्नॉलॉजीची स्वच्छ, हरित आणि अल्टरनेट फ्युअल आधारित तंत्रज्ञानाच्या विकासात भारतीय रेल्वेची मोठी झेप आहे.
रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या लेखील उत्तरात सांगितले की योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रोटोटाईप निर्मिती आणि हायड्रोजन ट्रॅक्शन तंत्रज्ञानाच्या विकासापर्यंत भारतीय रेल्वेचा पहिलाच प्रयत्न आहे. हा पायलट प्रोजेक्ट असल्याने लागलीच त्याची तुलना सध्या पारंपारिक ट्रॅक्शन प्रणालीशी करणे योग्य होणार नाही असेही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
