अमेरिका, रशिया किंवा चीनची नव्हे, या देशाची सीमा सर्वात सुरक्षित; ट्रम्प यांनीही दिली कबुली
Best Border Security : जगात एक असा देश आहे ज्याची सीमा सुरक्षा सर्वात कडक आहे. या देशाने अमेरिका, रशिया, चीन या देशांनाही मागे टाकले आहे. या देशाच्या सीमा सुरक्षेने डोनाल्ड ट्रम्प हे देखील प्रभावित झाले आहेत.

जगातील सर्वच देश आपल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी करोडो रुपये खर्च करत असतात. दुसऱ्या देशातील नागरिक किंवा दहशतवादी आपल्या देशात प्रवेश करू नये यासाठी ही काळजी घेतली जाते. तसेच अंमली पदार्थांची, प्राण्याची किंवा मानवी तस्करी रोखण्यासाठी सीमेवर जवान तैनात असतात. अलिकडेच पेनसिल्व्हेनियामध्ये बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्टटले की, आपली सीमा जगातील सर्वात मजबूत आहे, मात्र तरीही आपण उत्तर कोरियापेक्षा खूप मागे आहोत. उत्तर कोरियाची सीमेवर सात विद्युत तारांचे संरक्षण आहे. यातील प्रत्येक तारेत 10 दशलक्ष व्होल्टचा वीज प्रवाह सुरु असतो. त्यामुळे या देशात प्रवेश करणे कठीण आहे.
ट्रम्प यांचा उत्तर कोरियाच्या सीमेबाबतचा दावा खरा की खोटा?
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, उत्तर कोरियाच्या सीमेवर सात तारांचे कंपाउंड आहे. प्रत्येक तारेत 10 दशलक्ष व्होल्ट वीजप्रवाह सुरू असतो. जर तुम्ही या तारेच्या संपर्कात आलात तर तुमचा मृत्यू होऊ शकतो. मात्र ट्रम्प यांचा दावा खरा की खोटा याबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र तरीही उत्तर कोरियाची सीमा ओलांडणे धोकादायक आहे. या तुमचा जीव जाऊ शकतो. उत्तर कोरियाने कोणत्या देशांच्या सीमेवर तारांचे कुंपण आहे ते जाणून घेऊयात.
चीन-उत्तर कोरिया सीमा
उत्तर कोरियाने चीनच्या सीमेवरील तुमेन आणि यालू नद्यांच्या बाजूला हाय-व्होल्टेज विद्युत कुंपण घातले आहे. या तारांमध्ये 3300 व्होल्टचा वीज प्रवाह आहे. उत्तर कोरियातील लोक अंधारात सीमा ओलांडून चीनमध्ये प्रवेश करत होते, हे प्रकार रोखण्यासाठी 2023 मध्ये यालू नदीवरील नवीन पुलाभोवती या विद्युत तारा बसवण्यात आल्या आहेत.
DMZ झोन
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर निशस्त्रीकरण क्षेत्र (DMZ) आहे. 1953 मध्ये कोरियन युद्धानंतर झालेल्या युद्धविराम करारानुसार हा झोन तयार करण्यात आला असून तो 250 किमी लांब आणि 4 किमी रुंद आहे. या झोनमध्ये कोणत्याही देशाच्या सैन्याला किंवा शस्त्रांना परवानगी नाही. या झोनच्या सीमेवर दोन्ही देशांनी सैन्य तैनात केलेले आहे. या ठिकाणीही विद्युत कुंपण आहे.
सीमेवरील तारांना वीज कशी पुरवली जाते?
उत्तर कोरियाच्या सीमेवरील विद्युत प्रवाहाबाबत यांगगांग प्रांतातील एका पत्रकाराने सांगितले की, बायकाम काउंटीमधील बायकडू माउंटन सिलेक्टेड युथ पॉवर प्लांट या सीमा कुंपणाला वीज पुरवतो. मात्र यामुळे होएरियोंग शहरातील नागरिकांना दिवसातून फक्त तीन ते चार तास वीज पुरवली जाते.
