धुणीभांडी करणारी मोलकरीण अभिनेत्री झाली तेव्हा.., 100 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम, अंत मात्र अत्यंत वाईट
मोठ्या बापाची लेक पण का आली लोकांच्या घरात धुणीभांडी करण्याची वेळ..., तिचं एका रात्रीत नशीब चमकलं आणि केलं 100 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम... अभिनेत्रीचा अंत मात्र होता अत्यंत वाईट... यामुळे सर्वत्र सुरु आहे अभिनेत्रीची चर्चा...

हिंदी सिनेविश्वात अनेक अशा अभिनेत्री होऊन गेल्या, ज्यांच्यापुढे आजच्या अभिनेत्री फिक्या पडतील… त्यांचं अभिनय, सौंदर्य… सर्वच गोष्टी परफेक्ट होत्या… अशीच एक अभिनेत्री जिने प्रसिद्धी, संपत्ती आणि आदर मिळवला, पण मानसिक सुखासाठी अभिनेत्रीला मोठी किंमत मोजावी लागली. अभिनेत्रीच्या आयुष्यातील एक असा काळ होता, जेव्हा तिला दुसऱ्यांच्या घरात घुणीभांडी करावी लागली. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा सुरु आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री शशिकला आहे. शशिकला ज्या वेगाने यशाच्या शिखरावर चढत होत्या. त्याच वेगाने अभिनेत्रीचं खासगी आयुष्यातील सुख आणि समाधान देखील लांब होत होतं… अखेर मोठ्या निराशेने अभिनेत्रीने फक्त फिल्मी इंडस्ट्रीला नाही तर, मुंबईला देखील राम राम ठोकला.
असं सांगितलं जातं की, शशिकला फक्त 10 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांच्या वडिलांचं व्यवसायात मोठं नुकसान झालं आणि संपूर्ण कुटुंब एका झटक्यात रस्त्यावर आलं. अशात शशिकला यांचं स्वप्न होतं की, मुंबईत पोहोचल्यानंतर सिनेमांमध्ये काम करून, पैसा कमावेल… अभिनेत्रीचं कुटुंब मुंबईत तर पोहोचलं, पण कुटुंबाची भूक भागवण्यासाठी शशिकला यांना लोकांच्या घरात घुणीभांडी करण्याचं काम करावं लागलं. पण शशिकला यांच्या नशिबात चार घरची भांडी नाही तर, इंडस्ट्रीतील ग्लॅमर लिहिलं होतं.
शशिकला यांनी प्रभात स्टुडिओतून सुरुवात केली. मग, नूरजहान यांनी शशिकला यांना सेंट्रल स्टुडिओमध्ये पाहिलं आणि त्यांना एक भूमिका देऊ केली. पुढे, शशिकला यांना एका कव्वालीमध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळाली, ज्यातून त्यांना 25 रुपये मिळाले. ‘जीनत’ सिनेमातील ती एक कव्वाली होती. त्यानंतर शशिकला यांनी अनेक लाहन मोठ्या भूमिका साकारल्या… त्यानंतर शशिकला यांना 1945 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जुगनू’ सिनेमात दिलीप कुमार यांच्या लहान बहिणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
अखेर शशिकला यांना मुख्य अभिनेत्री म्हणून सिनेमे मिळण्यास देखील सुरुवात झाली. पण कोणताच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट ठरला नाही. पण शशिकला हे नाव इंडस्ट्रीमध्ये मोठं होत होतं. तेव्हाच, शशिकला याने उद्योजक ओमप्रकाश सहगल यांच्यासोबत लग्न केलं. 1955 मध्ये ओमप्रकाश यांनी पहिल्या सिनेमाची निर्मिती केली आणि सिनेमाचं नाव होतं ‘करोडपती’, सिनेमात किशोर कुमार यांच्यासोबत शशिकला मुख्य भूमिकेत होती..
‘करोडपती’ सिनेमात तब्बल 6 वर्षांनंतर प्रदर्शित झाला. पण सिनेमाने शशिकला यांना पूर्णपणे कंगाल केलं होतं. ओम प्रकाश सहगल यांच्यावर कर्ज झालं होतं आणि हेच कर्ज फेडण्यासाठी शशिकला यांनी मिळेल ती भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला. तेव्हा शशिकला यांना मुख्य अभिनेत्री नाही तर, खलनायीकेच्या भूमिका मिळू लागल्या…
आयुष्यात अनेक चढ – उतार पाहिल्यानंतर शशिकला यांनी स्वतःची ओळख निर्माण केला. पण अखेर त्यांची ओळख अभिनेत्री म्हणून नाही तर, खलनायिका म्हणून झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शशिकला आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील काही चुकांमुळे तीव्र नैराश्यात बुडाल्या. अखेर 4 एप्रिल 2021 रोजी त्यांचे निधन झालं.