AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : होय…गुन्हे दाखल करा…दिल्लीच्या आंदोलनाबाबत अभिजीत दीपकेंचं सर्वात मोठं विधान; मोदींनाही थेट प्रश्न!

मोदीजी रिलवर माफ करत आहेत. पण त्यांचे पोलीस केसेस दाखल करत आहे. मोदी इन्स्टाग्रामसाठी वेगळं बोलत आहेत. जमीनीवर वेगळं आहे. तुम्हाला माफ करायचं असेल तर केसेस मागे घ्या, अशी मागणी अभिजीत दीपके यांनी केली.

Abhijeet Dipke : होय...गुन्हे दाखल करा...दिल्लीच्या आंदोलनाबाबत अभिजीत दीपकेंचं सर्वात मोठं विधान; मोदींनाही थेट प्रश्न!
abhijeet dipke and cjp delhi protestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 01, 2026 | 7:01 PM
Share

CJP Abhijeet Dipke : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके सध्या देशभरात चर्चेचा विषय आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केल्याने धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी उभारलेल्या आंदोलनाला जेन झी तरुणांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदनावर दीपके यांच्या आंदोलनात हजारो तरुण सहभागी झाले होते. दरम्यान, टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी अभिजीत दीपके यांची मुलाखत घेतली. याच मुलाखतीत त्यांनी अनेक गंभीर विषयांवर भाष्य केलं. सोबतच त्यांनी दिल्लीतील आंदोलनादरम्यान तरुणांवर झालेल्या लाठीचार्जावर तसेच पोलिसांकडून दाखल होत असलेल्या गुन्ह्यांवरही आपली भूमिका स्पष्ट केली.

परंतु विद्यार्थ्यांवर अन्याय करू नये

सीजेपीचे आंदोलन संपल्यानंर आता अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगरातील आपल्या घरी आले आहेत. त्यांची प्रकृती सध्या खालावलेली आहे. दुसरीकडे आंदोलन संपल्यानंतर आता पोलीस काही ठिकाणी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करत आहेत. सीजेपीच्या आंदोलनात काही गुन्हेगारही सामील होते, असा दावा केला जातोय. यावर दीपके यांनी आपली  भूमिका स्पष्ट केली. आंदोलनात जर गुन्हेगार असतील तर त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत. परंतु विद्यार्थ्यांवर अन्याय करू नये. त्यांचे करिअर उद्ध्वस्त करू नये, अशी भूमिका दीपके यांनी घेतली आहे.

मोदी इन्स्टाग्रामवर वेगळं बोलत आहेत

दुसरीकडे मोदीजी इन्स्टाग्रामच्या रिलवर तरुणांना माफ करत आहेत. पण त्यांचे पोलीस केसेस दाखल करत आहेत. मोदी इन्स्टाग्रामवर वेगळं बोलत आहेत. जमीनीवर वेगळी स्थिती आहे. तुम्हाला माफ करायचं असेल तर केसेस मागे घ्या, असे आवाहनही त्यांनी मोदी सरकारला केले.

गुन्हेगारांना मोकळं कोण फिरू देत होतं?

आंदोलनात गुन्हेगार असतील तर त्यांना आत टाका. २०२१ चे गुन्हेगार आमच्या आंदोलनात फिरत होते असा आकडा आहे. २०२०-२०२१ चे गुन्हेगार मोकळे कसे फिरत होते. पोलीस काय करत होते. पोलीस त्या गुन्हेगारांना फिरू देत होते. पोलिसांच्या परवानगी शिवाय ते फिरत नसतील. मला जंतरमंतवर चेकिंग करूनच सोडत होते. आंदोलन आयोजित करणाऱ्या दीपकेला चेकिंगशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. मग इतर गुन्हेगार आत आलेच कसे, असा संतप्त सवालही दीपके यांनीक केला. गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झाला तर माझा विरोध नाही. पण सरकारला उत्तर द्यावं लागेल. हे गुन्हेगार मोकळे कसे फिरत होते हे सरकारने सांगितलं पाहिजे. ज्या जंतरमंतरवर चेकिंगशिवाय एन्ट्री नव्हती त्यांना गुन्हेगारांना प्रवेश कसा मिळाला, असंही दीपके यांनी यावेळी विचारलं.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था