PHOTO | अविनाश खर्शीकर : विनोदाचं अचूक टायमिंग साधणारा अवलिया!

| Updated on: Oct 08, 2020 | 2:30 PM

1 / 7
अभिनेते अविनाश खर्शीकरांनी आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांवर भूरळ घातली होती. 90च्या दशकात अभिनयासोबतच त्यांच्या लूकची देखील तितकीत चर्चा सिनेसृष्टीत होती.

2 / 7
विनोदाचे अचूक टायमिंग साधणारा अवलिया अशी त्यांची ओळख होती. चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करणाऱ्या अविनाश यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

3 / 7
‘माफीचा साक्षीदार’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी आपली अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.

4 / 7
.‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकात त्यांनी साकारलेली ‘श्याम’ची भूमिका विशेष गाजली होती. महाविद्यालयीन विद्यार्थी असणारा ‘श्याम’ ते वयाच्या 60व्या वर्षीदेखील तितक्याच ग्रेसफुली सादर करत होते.

5 / 7
'लफडा सदन' या नाटकातील त्यांची विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली.

6 / 7
वासूची सासू या गाजलेल्या नाटकात त्यांनी दिलीप प्रभावळकर यांच्यासह काम केले होते.

7 / 7
‘दामिनी’ या लोकप्रिय मालिकेत ते झळकले होते. दीर्घकाळ आजारी असलेल्या अविनाश खर्शीकर यांचे आज (8 ऑक्टोबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.