AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात मोठी खळबळ, भारताने घेतला थेट निर्णय, सीमा ओलांडून..

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली. दोन्ही देशातील वाद काही दिवसांपूर्वीच टोकाला पोहोचला होता. हेच नाही तर कोणत्याही क्षणी हल्ला होईल, अशी स्थिती होती. यादरम्यानच भारताने पाकिस्तानला अत्यंत मोठा झटका दिला.

पाकिस्तानात मोठी खळबळ, भारताने घेतला थेट निर्णय, सीमा ओलांडून..
India Pakistan
| Updated on: Feb 17, 2026 | 12:56 PM
Share

गेल्या कित्येक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावात आहेत. पाकिस्तान सातत्याने भारतात दहशतवादी कारवाया घडून आणत आहे. पाकिस्तानमधून दहशतवादी भारतात घुसखोरी करतात आणि थेट मोठी दहशतवादी हल्ले घडवून आणतात. एप्रिल महिन्यातच पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाम येथे मोठा हल्ला केला. या हल्ल्यात फक्त हिंदू पर्यटकांना टार्गेट करण्यात आले. तब्बल 26 लोकांचा जीव या हल्ल्यात गेला. कलमा वाचण्यास दहशतवाद्यांनी सांगितले, ज्या पर्यटकांना कलमा वाचता आला नाही, त्यांना थेट गोळ्या झाडल्या. या दहशतवादी हल्ल्याचे काही व्हिडीओ पुढे आले. पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचे स्पष्ट झाले. या हल्ल्यानंतर देशात संतापाची मोठी लाट बघायला मिळाली. भारतानेही ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचा बदला घेतला.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने थेट मोठा निर्णय घेत पाकिस्तानसोबतचा सिंधू करार रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. सिंधू नदी प्रणालीतील पाण्याचा प्रवाह रोखण्याचे काम सुरू केले. हा पाकिस्तानला अत्यंत मोठा झटका आहे. भारत हा करार मोडू शकत नसल्याचा दावाही पाकिस्तानने केला. सिंधू जल करारवरून भारताने पाकिस्तानच्या नाकात दम केला असताच आता अजून एक मोठा झटका देण्यात आला.

भारताने आता एकाच वेळी अनेक प्रकल्पांचे काम सुरू केले आहे. रावी नदीवर शाहपूर कांडी धरण जवळपास पूर्ण झाले आहे. हे धरण पूर्ण बांधल्यानंतर भारतामधून रावी नदीचे पाणी पाकिस्तानला अजिबात जाणार नाही. काही दिवसांपासून याचे काम सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरचे मंत्री जावेद अहमद राणा यांनी नुकताच सांगितले की, धरणाचे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होईल.

रावी नदीच्या पाण्यावर भारताचा अधिकार आहे. मात्र, त्याठिकाणी धरण नसल्याने पाणी पाकिस्तानमध्ये जात होते. आता धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे पाणी पाकिस्तानमध्ये जाणार नाही. हा अत्यंत मोठा झटका पाकिस्तानला म्हणावा लागेल. पाकिस्तानचा मोठा भाग रावी नदीच्या पाण्यावर अवलंबून होता. त्यामध्येच आता हे पाणी पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याने पाकड्यांची झोप उडालीये.

Follow Us
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
New Sugar Stock Norms : साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
Vijay Wadettiwar: काय शिजतंय ते आम्ही बघतोय, पवारांची राष्ट्रवादी-मोदी भेटीवरून वडेट्टीवारांचं विधान
मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
पुणे रेल्वे स्थानकावर 2 तरुणांना टीसीने पकडलं, मदतीसाठी तरुणांनी थेट खासदार ओमराजे निंबाळकरांना लावला फोन
चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू
Sambhajinagar : चांदगुडे कुटुंबामागे उरलं फक्त भयाण घर आणि कुटुंबाची वाट पाहणारा शेरू , 3 दिवसानंतर शेरुची सुटका
चाकण MIDCच्या विकासासाठी शिंदेंची बैठक,ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
चाकण एमआयडीसीच्या विकासासाठी शिंदे-सामंत यांची बैठक, ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती
संभाजीनगर: खोट्या अफवा थांबवा,कुणालच्या मावशीची समाजमाध्यमांना विनंती
मृत कुणालच्या मावशीचा कळकळीचा संदेश: सोशल मीडियावर कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवू नका
राहुल गांधींचा पुण्यातील कार्यक्रम ‘स्क्रिप्टेड पेड’;दरेकरांची टीक
राहुल गांधींचा पुणे दौरा स्क्रिप्टेड, पेड; प्रवीण दरेकरांची काँग्रेसवर टीका
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा:सुळेंचं लांडगेंना थेट आव्हान
प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान