AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस बनण्याचं स्वप्न भंगलं, लेकीला वाचवताना आई-बापासह भावाचाही अंत, महाराष्ट्र हळहळला

फलटण तालुक्यात खाकी वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्या आरतीला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या आई-वडील अन् भावाचा जागीच मृत्यू झाल्याची भयानक दुर्दैवी घटना घडली आहे.ऊसतोड कामगार असलेल्या सतीश शिंदे यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे.

पोलीस बनण्याचं स्वप्न भंगलं, लेकीला वाचवताना आई-बापासह भावाचाही अंत, महाराष्ट्र हळहळला
family of four was electrocuted to death in Satara
| Updated on: Jul 08, 2026 | 10:57 PM
Share

सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना फलटण तालुक्यातील खामगाव येथे आज पहाटे घडली आहे. घरासमोरील विजेच्या खांबावर असणाऱ्या केबलच्या वायरचा सपोर्ट तारेत करंट उतरल्याने आरती शिंदे हिला वीजेचा धक्का बसला आणि ती चिकटली. त्यामुळे तिच्या ओरडण्याने आरतीला वाचवायला गेलेली तिची आई, वडील आणि भाऊ देखील विद्युत प्रवाहाच्या विळख्यात सापडले आणि पाहता पाहता एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस भरतीचा सराव करून सकाळी लवकर परतणाऱ्या आरती शिंदे शिंदेच्या पायाला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र शॉक बसला. तिचा जीव वाचवण्यासाठी धावलेले आई, वडील आणि भाऊ देखील विद्युत प्रवाहाच्या विळख्यात सापडले आणि पाहता पाहता एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने खामगावसह संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

सतीश शिंदे (वडील), गंगुबाई शिंदे (आई), आरती शिंदे (मुलगी) आणि सचिन शिंदे (मुलगा) अशी जागीच मृत पावलेल्या दुर्दैवी सदस्यांची नावे आहेत. या भीषण दुर्घटनेतून सचिन यांचा मोठा भाऊ सागर आणि त्यांची पत्नी सुदैवाने बालंबाल बचावले आहेत. यामध्ये मयत सचिन शिंदे याची पत्नी आणि साडेतीन वर्षाचा लहान मुलगा देखील बचावला आहे

शिंदे कुटुंबीय हे अत्यंत गरीब असून ऊसतोडीचे कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत होते. खामगाव येथील एका खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ ते वास्तव्यास होते. कुटुंबाची गरिबी हटवण्यासाठी आणि अंगावर खाकी वर्दी चढवण्याचे स्वप्न उराशी बाळगून आरती शिंदे ही अहोरात्र पोलीस भरतीचा सराव करत होती. नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटेही ती धावण्याचा सराव करण्यासाठी बाहेर गेली होती.

पहाटे सहा वाजेच्या सुमारास सराव करून ती घरासमोर आली असता, महावितरणच्या खांबावरील केबल वायर च्या सपोर्ट तार तुटून जमिनीवर पडली होती. अंधार आणि अनवधानाने आरतीचा पाय या वायरवर पडला आणि ती विद्युत प्रवाहाच्या विळख्यात सापडली. विजेचा तीव्र झटका बसताच आरतीने मदतीसाठी प्रचंड आरडाओरडा केला. आपल्या पोटच्या लेकीला मृत्यूच्या दारात पाहून घरातून वडील सतीश, आई गंगुबाई आणि भाऊ सचिन हे मागेपुढचा कोणताही विचार न करता तिला वाचवण्यासाठी बाहेर धावले.

विद्युत प्रवाह जमिनीवर पसरला

मात्र, पाऊस किंवा हवेतील ओलसरपणामुळे विद्युत प्रवाह जमिनीवर पसरला होता. लेकीला वाचवण्याच्या प्रयत्नात हे तिघेही एकापाठोपाठ एक विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आले आणि काही क्षणांतच चौघांचेही जिवंत मृतदेह जमिनीवर पडले. हा थरार पाहून संपूर्ण परिसर सुन्न झाला. शिंदे कुटुंब हे कष्टाळू कुटुंब म्हणून गावात ओळखले जात होते. या दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले असून, त्यांच्या पश्चात केवळ सचिनचा भाऊ  सागर शिंदे त्यांची पत्नी, आणि मयत सचिनची पत्नी आणि साडेतीन वर्षांचा मुलगा आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे