AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट! अटकेनंतर नगरसेवक रमेश म्हात्रे थेट रुग्णालयात

पोलिसांनीदेखील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. मात्र अटकेची माहिती समोर आल्यानंतर काही वेळातच रमेश म्हात्रे यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट! अटकेनंतर नगरसेवक रमेश म्हात्रे थेट रुग्णालयात
ramesh mhatreImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 08, 2026 | 10:18 PM
Share

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनीच ही मारहाणा केली. रुग्णालयात जाऊन त्यांनी तसेच त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी दम देऊन डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या सर्व घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. काहीही झालं तरी रमेश म्हात्रे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीनंतर रमेश म्हात्रे यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली. या अटकेनंतर आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. रमेश म्हात्रे यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमके काय घडले आहे?

मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटकेनंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. संबंधित डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल आणि परवानगी मिळाल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याच प्रकरणात आज आमदार रोहित पवार आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात भेट देत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली होती.

अटकेची माहिती समोर येताच आता रुग्णालयात दाखल

या मागणी दरम्यानच पोलिसांनीदेखील मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. मात्र अटकेची माहिती समोर आल्यानंतर काही वेळातच रमेश म्हात्रे यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. रमेश म्हात्रे यांना नेमके काय झाले आहे? अटकेला टाळण्यासाठी तर हे सर्वकाही केले जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रमेश म्हात्रे यांनी काय सांगितले?

दुसरीकडे या मारहाणीच्या राजकीय पडसाद उमटल्यानंतर रमेश म्हात्रे यांनी घडलेल्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलेवर हात उचलायचा नाही, अशी शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली आहे. आमचे म्हणणे ऐकून घ्या, हातातील फोन बाजूला ठेवा, एवढेच माझे मत होते, असा दावा रमेश म्हात्रे यांनी केला.

Follow Us
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज...
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज पुन्हा कोअर कमिटीची मिटिंग सुरु
राजकीय हालचालींना वेग! निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचं...
राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित, दिल्लीत हालचालींना वेग