AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhu Kambikar Passes Away: मधू कांबीकर होत्या या प्रसिद्ध लेखकाच्या मावशी, घरात आठरा विश्व दारिद्रय तरीही संघर्ष करत झाल्या अभिनेत्री

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी मधु कांबीकर यांचे निधन झाले आहे. त्या लोककलेचा वारसा जपणाऱ्या समर्थ लावणी कलावंत म्हणून त्या ओळखल्या जायच्या. पण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

Madhu Kambikar Passes Away: मधू कांबीकर होत्या या प्रसिद्ध लेखकाच्या मावशी, घरात आठरा विश्व दारिद्रय तरीही संघर्ष करत झाल्या अभिनेत्री
Madhu KambikarImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 11:19 AM
Share

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय दिग्गज अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी पुण्यातील घरात अखेरचा श्वास घेतला. दीर्घ कालीन आजाराने त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. मधू यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. दिग्गज अभिनेने नाना पाटेकर यांच्या निधनाच्या पाच दिवसांनंतरच लगेच मराठी चित्रपटसृष्टीने आणखी एक मोठा कलाकार गमावला आहे.

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी मधु कांबीकर या दिवंगत लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या मावशी होत्या. डॉ. किशोर शांताबाई काळे यांनी आपल्या गाजलेल्या ‘कोल्हाट्याचं पोर’ या आत्मचरित्रात आपल्या खडतर प्रवासाचे आणि कौटुंबिक पार्श्वभूमीचे वास्तव मांडले आहे. यामध्ये त्यांच्या संघर्षाच्या काळात अभिनेत्री मधु कांबीकर यांनी त्यांना मदत केल्याचा उल्लेख आहे.

अभिनेत्री म्हणून लौकीक मिळवला

समाज व्यवस्थेने नाकारलेल्या आणि सतत भटकंती करणाऱ्या कोल्हाटी समाजात मधू कांबीकर यांचा जन्म 28 जुलै 1953 रोजी झाला होता. त्यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द. घरात आठरा विश्व दारिद्रय, रोजचा दिवस कसा ढकलावा याचं टेन्शन असलेल्या समाजातून येऊन सुद्धा त्यांनी अथक परिश्रम करून नावलौकीक मिळवला. त्यांनी अभिनेत्री म्हणून लौकीक मिळवला.

मधू कांबीकर यांचा प्रवास

मधू कांबीकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या ‘सतीची पुण्याई’, ‘शापित’, ‘हेच माझं माहेर’, ‘ह्योच नवरा पाह्यजे’, ‘झपाटलेला’, ‘एक होता विदूषक’ आणि ‘रावसाहेब’ या चित्रपटांमधील भूमिका विशेष उल्लेखनीय होत्या. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. लावणी, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून मधू कांबीकर यांनी आपल्या कलेची छाप पाडली. ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक ओळख मिळवून देण्यातही त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. एकदा लावणी सादर करत असताना त्या भर स्टेजवर कोसळल्या. त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्या कित्येक वर्षे अंथरुणात होत्या.

Follow Us
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...