कलाविश्वाला मोठा धक्का ! दिग्गज अभिनेत्रीने वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Jan 27, 2023 | 2:01 PM

वयाच्या १६ व्या वर्षी अभिनयाची सुरुवात केलेल्या दिग्गज अभिनेत्री यांचं वयाच्या ८६ वर्षी निधन, कला विश्वातून हळहळ व्यक्त... चिरंजीही आणि एनटीआर याचं ट्विट चर्चेत

कलाविश्वाला मोठा धक्का ! दिग्गज अभिनेत्रीने वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कलाविश्वाला मोठा धक्का ! दिग्गज अभिनेत्रीने वयाच्या ८६ वर्षी घेतला अखेरचा श्वास
Follow us on

मुंबई : साऊथ सिनेविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. साऊथ कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जमुना यांचं निधन झालं आहे. जमुना यांनी वयाच्या ८६ वर्षी अखेरचा श्वास घेतला. जमुना यांच्या निधनामुळे कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जमुना वयाशी संबंधित आजारांमुळे त्रस्त होत्या. आजाराने त्रस्त असलेल्या जमुना यांनी हैदराबाद याठिकाणी असलेल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच साऊथ इंडस्ड्री आणि चाहत्यांच्या मनामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जमुना यांच्या निधनामुळे साऊथ इंडस्ड्रीला मोठं नुकसान झालं आहे… असं म्हणायला हरकत नाही.

जमुना यांच्या निधनानंतर सुपरस्टार ज्यूनियर एनटीआर याने ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे. ज्यूनियर एनटीआर ट्विट करत म्हणाला, ‘जमुना यांनी जवळपास ३० वर्षांपेक्षा जास्त तेलुगू कलाविश्वात राज्य केलं. जमुना यांनी त्यांच्या सिनेमातून आमच्या मनावर छाप पाडली आहे. गुंडम्मा कथा, मिसम्मा यांसारख्या सिनेमामध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं..’ अशा भावना अभिनेत्याने व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा

 

 

दिग्गज अभिनेते चिरंजीवी यांनी देखील ट्विट करत भावना व्यक्त केल्या आहेत. चिरंजीवी ट्विट करत म्हणाले, ‘जमुना यांच्या निधनानंतर प्रचंड दुःख होत आहे. त्या बहुभाषी अभिनेत्री होत्या. त्यांची मातृभाषा कन्नड आहे. पण त्यांनी अनेक सिनेमांमध्ये वेग-वेगळ्या भूमिका साकारल्या आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं.’ सध्या अभिनेते चिरंजीवी यांचं ट्विट तुफान व्हायरल होत आहे.

 

 

दिग्गज अभिनेत्री जमुना यांना लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं आणि त्यांनी त्यांच स्वप्न पूर्ण देखील केलं. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. 1953 साली प्रदर्शित झालेल्या डॉ. गरिकापति राजाराव यांच्या पुत्तिल्लु सिनेमात भूमिका साकारली. जमुना यांचा जन्म ३० ऑगस्ट १९३६ मध्ये हम्पी याठिकीणी झाला. जमुना यांना अनेक हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.