
सध्या सगळीकडे १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. सध्या सोशल मीडियावर या सिनेमातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये औरंगजेबाचा क्रूरपणा दाखवण्यात आला आहे. त्याने एका जिवंत मुलीला कसे जाळले हा सीन कसा शूट झाला हे दाखवण्यात आले आहे.
‘छावा’ या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. तसेच औरंगजेब हा किती क्रूर होता हे दाखवले आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील अनेक सीन्सची चर्चा होती. आता सिनेमातील अंगावर काटे आणणाऱ्या सीनचा व्हिडीओ व्हायरल झाला हे. जो पाहून प्रेक्षकांचा थरकाप उडाला होता. हा सीन म्हणजे औरंगजेबाची सेना एका मुलीला जिवंत जाळते. हा सीन कसा शूट झाला हे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. या सीनमध्ये एका मराठी स्टंटगर्लने जीव धोक्यात घालून परफॉर्म केले आहे. या सीनचा BTS व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ उडवतोय.
काय आहे नेमका सीन?
‘छावा’ सिनेमामध्ये औरंगजेब स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी मोठ्या सैन्यासह निघताना दाखवण्यात आले आहे. दरम्यान, एक तरुणी मेंढ्या घेऊन रानात उभी असते. तेवढ्याच अचानत औरंगजेबाच्या सैन्याचे लक्ष जाते. ते त्या निर्दोष मुलीला जिवंत जाळतात. हा सीन पाहताना प्रेक्षकांचा अंगावर काटा आला असेल. हा सीन करणारी स्टंटगर्ल ही मराठी मुलगी, साक्षी सकपाळ आहे. तिने जीवाची पर्वा न करता हा सीन शूट केला आहे.
छावा सिनेमाविषयी
‘छावा’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल दिसत आहे, त्यांची पत्नी येसुबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे तर औरंगजेब ही भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार देखील दिसले आहेत. त्यामध्ये संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांचा समावेश आहे.