विकी कौशलला आवडतात हे महाराष्ट्रीयन पदार्थ; म्हणाला, “माझं बालपणच…”

छावा चित्रपटानंतर विकी कौशलची क्रेझ प्रचंड वाढली आहे. बऱ्याच मुलाखतींमध्ये तो मराठीमध्येही संभाषण करताना दिसला. एवढंच नाही तर विकीला महाराष्ट्रीय जेवण, तसेच काही पदार्थ फार आवडतात. त्याने एका मुलाखतीत त्याला आवडणाऱ्या महाराष्ट्रीयन पदार्थांची यादीच सांगितली.

विकी कौशलला आवडतात हे महाराष्ट्रीयन पदार्थ; म्हणाला, माझं बालपणच...
Vicky Kaushal Favorite Maharashtrian Dishes
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2025 | 6:37 PM

अभिनेता विकी कौशल हा त्याच्या ‘छावा’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटाप्रमाणे प्रेक्षकांनी विकी कौशल, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, एवढंच नाही तर नकारात्मक भूमिका साकारलेल्या अक्षय खन्नाचंही तेवढंच कौतुक केलं आहे. तसेच छावा चित्रपटात काम केलेले इतर कलाकारही मोठ्या चर्चेत आहेत.

पण या निमित्ताने विकी कौशलच्याबाबत अनेक गोष्टी व्हायर होऊ लागल्या. त्यातीलच एक म्हणजे त्याला आवडणारे महाराष्ट्रीयन पदार्थ. विकीला उत्तम मराठी बोलता येतं हे सर्वांनाच माहित आहे. पण त्याला महाराष्ट्रीयन पदार्थही तेवढेच आवडतात. एका मुलाखतीत त्याने त्याला आवडत असलेल्या महाराष्ट्रीयन पदार्थांची यादीच सांगितली.

विकी कौशलला अवडतात हे महाराष्ट्रीयन पदार्थ

एका मुलाखतीत विकी कौशलला महाराष्ट्रातील कोणता पदार्थ तुला खूप आवडतो, असं विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना त्याने म्हटलं, “एक नाही खूप आहेत. मला मालवणी जेवण खूप आवडतं. पण, माझा आवडता नाश्ता मिसळ पाव आहे. मला मिसळ पाव खूप आवडतो. कोणतंही डाएट असू दे, थोडतरी मिसळ पाव मी खातोच”. असं म्हणत विकी कौशलने महाराष्ट्रातील आवडता पदार्थ कोणता आहे हे सांगितलं आहे. तसेच त्याच्या पदार्थांच्या यादीत उकडीचे मोदक, वडापाव हे पदार्थही खूप आवडतात. तसेच त्याला पंजाबी पदार्थांमध्ये छोले भटूरे प्रचंड आवडतात.असही त्याने सांगितलं आहे.


‘छावा’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेची छाप अजूनही कायम 
विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकल्याचं पाहायला मिळत आहे. छावा चित्रपटात त्याने अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याने साकारलेली भूमिका पाहून प्रेक्षक भावूक झाल्याचंही दिसत आहे. याबरोबरच अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली असून अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक बॉलीवू़ड तसेच मराठी कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

चित्रपट तब्बल 600 कोटींच्या जवळ

14 फेब्रुवारी 2025 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने मोठी कमाई केली. आता चित्रपट तब्बल 600 कोटींच्या जवळ गेल्याचं पाहायाला मिळालं. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.