सुनेसमोर आईचा लेकासोबत लग्नातच आक्षेपार्ह डान्स; सेलिब्रिटीच्या आरोपाने खळबळ

ब्रुकलिन बेकहॅमने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याच्याच आईवर गंभीर आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर माझं कुटुंब अत्यंत 'टॉक्सिक' असल्याची टीका त्याने केली आहे. ब्रुकलिनच्या या पोस्टमुळे त्यांचा कौटुंबिक वाद चर्चेत आला आहे.

सुनेसमोर आईचा लेकासोबत लग्नातच आक्षेपार्ह डान्स; सेलिब्रिटीच्या आरोपाने खळबळ
Brooklyn Beckham and Victoria Beckham
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 21, 2026 | 12:14 PM

माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमचा कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर आला आहे. डेव्हिडचा मोठा मुलगा ब्रुकलिन बेकहॅम याने आई आणि गायिका व्हिक्टोरिया बेकहॅमवर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात ब्रुकलिनने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पसरलेल्या अफवांना आणखी हवा मिळाली आहे. माझं कुटुंब अत्यंत ‘टॉक्सिक’ (विषारी) असल्याचा आरोप ब्रुकलिनने केला आहे. 2022 मध्ये त्याने अभिनेत्री निकोला पेल्ट्झ हिच्याशी लग्न केलं. या लग्नात आई व्हिक्टोरियाने मोठा गोंधळ घालत आक्षेपार्ह पद्धतीने डान्स केल्याचा खुलासा ब्रुकलिनने केला. त्याच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे.

ख्रिश्चन विवाहपद्धतीत, लग्नानंतर वर आणि वधूला एकत्र नाचावं लागतं आणि याला ‘फर्स्ट डान्स’ असं म्हटलं जातं. हा फर्स्ट डान्स प्रत्येक जोडप्यासाठी खूप खास असतो. परंतु ब्रुकलिनच्या मते, त्याची आई व्हिक्टोरियाने त्याची पत्नी निकोलाकडून हा खास क्षण चोरला. व्हिक्टोरियाने तिच्या मुलाचा पत्नी निकोलासोबतचा फर्स्ट डान्स डायजॅक केला आणि स्वत: त्याच्यासोबत नाचू लागली. इतकंच नाही तर ब्रुकलिनने असाही दावा केला की आईने त्याच्यासोबत आक्षेपार्ह पद्धतीने डान्स केला, ज्यामुळे सर्वांसमोर त्याला खूप लाज वाटली आणि त्याचा अपमान झाला.

ब्रुकलिनच्या या दाव्यांनंतर, सोशल मीडियावर त्याची आई व्हिक्टोरिया बेकहॅमची खिल्ली उडवली जात आहे. यासंदर्भात अनेक मीम्स आणि व्हिडीओ नेटकऱ्यांकडून शेअर केले जातआ हेत. गेल्या काही वर्षांपासून ब्रुकलिनचे त्याच्या कुटुंबाशी वाद असल्याची चर्चा होती. परंतु आता त्याच्या या पोस्टने या वादावर शिक्कामोर्तब झाला आहे. ब्रुकलिनने त्याच्या पोस्टमध्ये असाही दावा केला की, वडील डेव्हिड आणि आई व्हिक्टोरिया हे त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते. याचा त्याच्या पत्नीसोबतच्या नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम झाला. आईवडील माझ्या पत्नीचा अनादर करतात, असा आरोप ब्रुकलिनने केला. कौटुंबिक संबंधांमुळे मला अनेक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याची कबुली त्याने या पोस्टद्वारे दिली. या कौटुंबिक संघर्षामुळे तो बराच काळ मानसिक ताण अनुभवत होता.