VIDEO : बहुचर्चित 'पिहू'ला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद

मुंबई : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘पिहू’ सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहिल्यापासून सोशल मीडियासह अनेक ठिकाणी अनेकांनी पिहू सिनेमाबद्दल उत्सुकता बोलून दाखवली होती. अखेर पिहू सिनेमाला रिलीज झाला असून, त्याला प्रेक्षकांचा प्रतिसादही तुफान मिळताना दिसतो आहे. अवघ्या दोन वर्षांच्या मायरा विश्वकर्मा या चिमुकलीच्या अभिनयाने साकारलेल्या पिहू सिनेमाची सगळेच कौतुक करत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर …

VIDEO : बहुचर्चित 'पिहू'ला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद

मुंबई : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘पिहू’ सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहिल्यापासून सोशल मीडियासह अनेक ठिकाणी अनेकांनी पिहू सिनेमाबद्दल उत्सुकता बोलून दाखवली होती. अखेर पिहू सिनेमाला रिलीज झाला असून, त्याला प्रेक्षकांचा प्रतिसादही तुफान मिळताना दिसतो आहे.

अवघ्या दोन वर्षांच्या मायरा विश्वकर्मा या चिमुकलीच्या अभिनयाने साकारलेल्या पिहू सिनेमाची सगळेच कौतुक करत आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी सुन्न होणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. शिवाय, सिनेसमीक्षकांनीही पिहू सिनेमाला सरासरी चार स्टार दिले आहेत. तसेच, आपापल्या समीक्षणामध्ये सुद्धा पिहू आणि चिमुकल्या मायराचे भरभरुन कौतुक केले आहे.

VIDEO : पाहा भारावलेल्या प्रेक्षकांनी ‘पिहू’ पाहिल्यानंतर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *